तरुण भारत

सीईटी पार पडली सुरळीत

प्रतिनिधी /बेळगाव

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली सीईटी परीक्षा बेळगावमध्ये सुरळीत पार पडली. दोन दिवस चाललेली ही परीक्षा जिल्हय़ातील एकूण 15 परीक्षा केंद्रांवर पार पडली. बेळगाव शहरात एकूण 15 परीक्षा केंद्रांवर परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. यामुळे शहरात सर्वत्र विद्यार्थ्यांची वर्दळ दिसून आली.

Advertisements

यावषी शनिवार व रविवार असे दोन दिवस सीईटी पार पडली. शनिवारी जीवशास्त्र व गणित तर रविवारी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचे पेपर झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करूनच त्याला परीक्षा केंद्रावर सोडले जात होते. सकाळी 10.30 ते 11.50 पहिला पेपर तर दुपारी 2.30 ते 3.50 या वेळेत दुसरा पेपर पार पडला.

बेळगाव शहरातील आरपीडी महाविद्यालय, जीएसएस महाविद्यालय, गोगटे महाविद्यालय, गोमटेश महाविद्यालय, आरएलएस महाविद्यालय, जी. एस. सौंदत्ती पदवीपूर्व महाविद्यालय, ज्योती पदवीपूर्व महाविद्यालय, लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालय, मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालय, सरदार्स पदवीपूर्व महाविद्यालय, इस्लामिया पदवीपूर्व महाविद्यालय येथे परीक्षा घेण्यात आली. 

Related Stories

वडगाव-यरमाळ रस्त्याचे डांबरीकरण कधी?

Amit Kulkarni

राऊंड टेबलतर्फे गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी रॅलीचे उद्घाटन

Amit Kulkarni

वॉशिंगमशिन दुरुस्तीसाठी आले…अन् लाखांचे दागिने पळविले

Patil_p

जलवाहिन्यांमुळे सांडपाणी वाहण्यास अडथळा

Amit Kulkarni

शासकीय कागदपत्रांसाठी गर्दी

Amit Kulkarni

हद्द निश्चित करण्यासाठी पोलिसांनी लावले फलक

Amit Kulkarni
error: Content is protected !!