तरुण भारत

पूर पंचनाम्यांत `डाटा एंट्री’चा घोळ!

कृष्णात पुरेकर/कोल्हापूर

जुलैमधील महापुरातील नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले, पण  पूरग्रस्तांच्या यादीत `डाटा एंट्री’ करताना चुका झाल्या. शहरातील पुरग्रस्त यादीत अशा चुकांसह घाईगडबडीत यादी प्रसिद्ध झाली, त्यामुळे दुरूस्तीपुर्वीच्या यादीने लाभार्थ्यांच्या तक्रारींत वाढ झाली आहे. तळमजला, पहिला मजला यातून झालेल्या चुकांचा मनःस्ताप पुरग्रस्तांसह पथकातील अधिकारी, कर्मचाऱयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे दुरूस्तीसह अंतीम यादी जाहीर करण्याची मागणी वाढत आहे.

Advertisements

जिल्ह्यात जुलैच्या दुसऱया पंधरवडयात अतिवृष्टी, महापुराने सप्ताहभर जनजीवन ठप्प झाले. पूर ओसरताच नुकसानीच्या पंचनाम्यांना गती आली. घरांची पडझड, प्रापंचिक साहित्याचे नुकसान अन् पुराचे पाणी घरात शिरलेल्या कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे पुराबाधीत नुकसानीचे तातडीने पंचनामे पुर्ण केले. शहरात 24 पथकांद्वारे पंचनाम्याची प्रक्रिया पुर्ण झाली. पथकांत महसुल कर्मचारी, तलाठी, महापालिकेचा कर्मचारी, अधिकाऱयांचा समावेश होता.

वंचित लाभार्थ्यांच्या संपर्कामुळे मोबाईल `स्विच ऑफ

शहरातील उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, जुना बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, नागाळा पार्क, रमणमळा, कसबा बावडा नदीकाठचा भाग, जाधववाडी, कदमवाडी, बापट कॅम्प, मार्केट यार्ड, सुतार मळा, व्हिनस कॉर्नर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आदी भागात पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. पुराचे पाणी शिरलेल्या 10 हजार 646 कुटुंबांची यादी महापालिकेने विभागीय कार्यालयांत प्रसिद्ध केली, अन् येथूनच प्रत्यक्ष पुरग्रस्त असूनही यादीत नावे नसलेल्यांच्या तक्रारी वाढल्या, त्यामुळे पथकातील काहींनी मोबाईल काही दिवस `स्विच ऑफ’ केल्याचे दिसून आले.

तळमजला, पहिला मजल्याच्या चुकीच्या नोंदीमुळे नावे गहाळ

पुरग्रस्तांची कच्ची यादी पाहिल्यानंतर त्यामध्ये तळमजला, पहिल्या मजल्यावर पाणी आल्याच्या नोंदी आहेत. पण डाटा एंट्री ऑपरेटरला त्या समजल्या नाहीत, या गैरसमजातून तळमजल्याची नोंद पहिला मजला म्हणून झाली, पण प्रत्यक्षात दुसरा मजला म्हणून नोंद झाल्याने या लाभार्थ्यांची नावे यादीत आलेली नाहीत,  ही नावे वगळून यादी प्रसिद्ध झाली आहे. मनपा पंचनामा यादीत नावे आहेत, पण प्रसिद्ध यादीत नावे नसलेल्यांच्या तक्रारीं वाढल्या आहेत. यासंदर्भात चौकशी करता महसूल विभागाकडे बोट दाखवले जात आहे. चुकीच्या नोंदीमुळे नावे गहाळ झाल्याने पुरग्रस्तांकडून सतत विचारणा होऊ लागली आहे.

`महसूल’च्या कर्मचारी, तलाठÎांकडून महापालिकेला दुरूस्त याद्या दिल्या, पण त्यापुर्वीची सानुग्रह अनुदानाची पुरग्रस्तांची कच्ची यादीत महापालिकेने घाईगडबडीत प्रकाशित केली. चुकांसह यादी जाहीर झाल्याने प्रत्यक्ष पुरग्रस्त असूनही नावे नसलेल्यांची कोंडी झाली आहे. बिले महसूल विभाग काढणार असल्याने तक्रारींसाठी महसूल कर्मचारी, तलाठÎांकडे बोट दाखवले जात आहे.

कोल्हापूर शहर पंचनामे झालेली कुटुंब संख्या 10646

पंचनामे पुर्ण झालेल्या मिळकती 3565

घर पडझड झालेल्या मिळकती 120

मोठÎ पडझडीच्या मिळकती    105

व्यावसायिक मिळकती 3351

कारागिर नुकसान 410

कोल्हापूर जिल्हा

अंशतः पडझड झालेली घरे 5795 पंचनामे पुर्ण 5290

पुर्णतः घरांची पडझड ः 1080   ः पंचनामे पुर्ण ः 180

Related Stories

हातकणंगले बस स्थानकात परप्रांतीय कामगारांनी मांडला ठिय्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर : टोप खणीचा सातबारा महापालिकेच्या नावावर !

Abhijeet Shinde

पुरग्रस्त नागरिक करतायेत पडक्या घरातूनच कोरोनाशी मुकाबला

Abhijeet Shinde

जिल्हा बँक : यड्रावकरांसाठी राजू शेट्टींना साकडं आमदार कोरे, आवाडें मार्फत प्रयत्न

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात 19 रूग्ण, 14 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हिंमत असेल तर वीज कनेक्शन तोडून दाखवा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!