तरुण भारत

अमेरिकन सैन्याने देश सोडताच तालिबानचा जल्लोष

ऑनलाईन टीम / काबुल :

वीस वर्षांच्या प्रदीर्घ युद्धानंतर अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे. सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने काबुलमधून उड्डाण केले. त्यानंतर तालिबानने देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा करून फटाक्यांची आतिषबाजी अन् हवेत गोळीबार करून जल्लोष केला.

Advertisements

अमेरिकेने काबूल सोडल्यानंतर तालिबानने काबूल विमानतळ ताब्यात घेतले आहे. आता जर कोणाला देशाबाहेर जायचे असेल तर तालिबानच्या परवानगीनंतरच जाता येणार आहे. अफगाणिस्तानवर आता तालिबानचे पूर्णपणे नियंत्रण असणार आहे.

दरम्यान, अमेरिकेची 20 वर्षांपासून अफगाणिस्तानातील लष्करी उपस्थिती आता संपली आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे. आपल्या कमांडर्सचे आभार मानत आणखी अमेरिकन नागरिकांचे आणखी जीव जाऊ न देता अफगाणिस्तानातून बाहेर काढले असे म्हटले आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आतापर्यंत 1, 23,000 लोकांना बाहेर काढले आहे. त्यामध्ये अमेरिकन नागरिकांसह अफगाण नागरिकांचाही समावेश आहे.

Related Stories

रशियाची पहिली लस सर्वसामान्यांसाठी खुली

datta jadhav

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पावणेदोन कोटींवर

datta jadhav

देशात मागील 24 तासात 63,509 नवे कोरोना रुग्ण; 730 मृत्यू

datta jadhav

चर्चिलच्या चित्राचा विक्रमी लिलाव

Patil_p

श्रीलंकेत आर्थिक आणीबाणी लागू

Amit Kulkarni

चीनमधील अमेरिकन पत्रकारांची होणार हकालपट्टी

datta jadhav
error: Content is protected !!