तरुण भारत

अफगाणिस्तानात ‘तहरीक-ए-तालिबान अमिरात’ची स्थापना

ऑनलाईन टीम / काबुल :

अमेरिकेचे सैन्य काबुलमधून परतल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. त्यानंतर आता अफगाणिस्तानात पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि हक्कानी नेटवर्कने एकत्र येत दहशतवादाचे नवे नेटवर्क अस्तित्वात आणले आहे. या नेटवर्कचे ‘तहरीक-ए-तालिबान अमिरात’ असे नामकरण करण्यात आले आहे.

Advertisements

अफगाणिस्तानात काळजीवाहू सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून, यात हक्कानी नेटवर्कलाही स्थान मिळणार आहे. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, जैश-ए-मोहम्मद संघटना सर्वात ताकदवान दहशतवादी संघटनेकडून अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्याचा या संघटनेचा मनसुबा असून, त्यासाठी जैशच्या कुख्यात दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातील ऑपरेशनसाठी पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे तालिबान्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारत विरोधी कारवायांमध्ये तालिबान पाकिस्तानला मदत करू शकते, याची भीती भारताला आहे.

Related Stories

विमानवाहतूक सुधारायला 2024 उजाडणार

Patil_p

अयोध्येतील मशिदीचे संकल्पचित्र प्रसिद्ध

datta jadhav

वर्ल्ड अर्थ डे आज

Patil_p

रशिया : 18 हजार रुग्ण

Patil_p

सोलापूरात आजपासून कडक लॉक डाऊन

Rohan_P

जम्मूमध्ये सलग चौथ्या दिवशी अज्ञात ड्रोन्सचा वावर

datta jadhav
error: Content is protected !!