तरुण भारत

कर्नाटकात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट, तर १५ मृत्यू

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये सोमवारी नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट झली आहे. देशात तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात असताना नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट होणे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात कोरोनाचे नवीन ९७३ रुग्ण सापडले तर १५ जणांचा मृत्यू झाला. तसेच १,३२४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ३९२ आहे. तर सोमवारी दिवसासाठी सकारात्मकता दर ०.६४ टक्के होता, तर केस मृत्यू दर (सीएफआर) १.५४ टक्के होता.

राज्यात आतापर्यंत २९ लाख ४८ हजार २२८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी २८ लाख ९२ हजार ५१७ रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे ३७ हजार २९३ जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.

बेंगळूर शहरी जिल्ह्यात सोमवारी २६४ नवीन रुग्णांची नोंद झाली. याच वेळी २६१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

Advertisements

Related Stories

उत्तराखंडमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 2984 वर 

Rohan_P

महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल उद्या ऑनलाईन होणार जाहीर

Rohan_P

अटी आणि शर्थींसह सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होईल : नितीन गडकरी

Rohan_P

“हिरेन हत्येचे पुरावे नष्ट करण्याचं राज्य सरकारचं षडयंत्र”

Abhijeet Shinde

आचारसंहितेचे उल्लंघन; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला निवडणूक आयोगाचा झटका

Rohan_P

कणकवली रुग्णालयासमोर दुचाकी गॅरेजला आग!

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!