तरुण भारत

शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी सांगलीत निदर्शने

सांगली प्रतिनिधी

मुसळर पावसामुळे पूर येऊन नुकसान झालेल्यांना राज्य शासनाकडून मदत जाहीर झली आहे. परंतु अनेकांना ही मदत मिळालेली नाही. दरम्यन, पूरग्रस्त नागरिकांच्या बरोबरच व्यापारी, शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित असून राज्य शासनाने पूरग्रस्त शेतकरी व व्यापारी यांना भरीव मदत करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे पृथ्वीराज पवार व कार्यकर्त्यांच्या वतीने मंगळवारी सांगली शहरात निदर्शने केली. स्टेशन चौक ते काँग्रेस कमिटी या मार्गावर रॅली काढून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच तातडीने मदत न केल्यास आणखी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात चंद्रकांत सूर्यवंशी, रेखा पाटील यांच्यासह पूरग्रस्त व्यापारी शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते.

Advertisements

Related Stories

पूरबाधितांना 71 कोटी अनुदान वितरीत

Abhijeet Shinde

सांगली : मुलाच्या प्रवेशासासाठी पैसे मागितल्याने पतीने पत्नीलाच रिव्हॉलवरने धमकावले

Abhijeet Shinde

कराड-रत्नागिरी महामार्ग २ तासासाठी रोखला

Abhijeet Shinde

सांगली महापालिका कर्मचाऱ्यांचा एक दिवस स्वच्छतेसाठी उपक्रम

Abhijeet Shinde

कुपवाड एमआयडीसीत तरुणाला काठी व दगडाने बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा

Abhijeet Shinde

सांगली : कृषी सेवा केंद्रांना दोन तास वेळ वाढवून द्या : संदिप राजाेबा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!