तरुण भारत

जिओ फोन ‘नेक्स्ट’चे बुकिंग चालू आठवडय़ापासून

10 सप्टेंबर रोजी मोबाईल येणार बाजारात – फोन खरेदीसाठी कर्ज मिळणार

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

रिलायन्स जिओकडून सादर होणाऱया नवीन जिओ फोन ‘नेक्स्ट’चे बुकिंग चालू आठवडय़ात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सदरच्या फोनसाठी फक्त 10 टक्के रक्कम जमा करुन या फोनचे बुकिंग करता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदरचा हा स्मार्टफोन 4 जी सुविधेचा असून येत्या 10 सप्टेंबर रोजी जिओ नेक्स्टचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

जिओने कर्जसुविधेसाठी बँका आणि फायनान्शिअल संस्थांसोबत करार केला आहे. ज्या बँकांसोबत जिओने करार केला आहे, त्यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक, पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि अन्य संस्थांचा समावेश राहणार आहे.

10 सप्टेंबर रोजी होणार सादर

जिओ फोन नेक्स्टचे सादरीकरण हे येत्या 10 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. या दिवसांपासून फोन बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

गुगलसोबत भागीदारी

जिओ फोन नेक्स्टची निर्मिती करण्यासाठी दिग्गज कंपनी गुगलसोबत भागीदारी करण्यात आली आहे. रिलायन्स जिओने येत्या सहा महिन्यात 5 कोटी जिओ फोन नेक्स्टची विक्री करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

Related Stories

इनफिनिक्स झिरो 8 आय बाजारात

Patil_p

वनप्लसचा नवा अनोखा 8 टी फोन बाजारात

Omkar B

ओप्पो एफ 17 प्रो चे सादरीकरण

Patil_p

‘लावा’ भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

ओप्पोचा एफ 15 स्मार्टफोन बाजारात

Patil_p

एमआय 10 आय आज होणार दाखल ?

Patil_p
error: Content is protected !!