तरुण भारत

सांगली : माडग्याल मेंढीची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना भुरळ

जतच्या कुनिकोनुर गावात येऊन केली खरेदी

प्रतिनिधी / जत

Advertisements

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील माडग्याळ मेंढी खरेदीसाठी जत तालुक्यातील कुनिकोणुर येथे येऊन प्रत्यक्ष मेंढपाळांना व मेंढ्याच्या कळपास भेट देऊन जातिवंत सात माडग्याळ मेंढी खरेदी केल्या.

यावेळी बोलताना विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले , कुणिकोणुर (आबाचीवडी) सारख्या छोट्याशा गावात गेली चाळीस वर्ष माडग्याळ मेंढीचे चांगल्या पद्धतीने पैदास व संवर्धन केले जात आहे. त्यामुळे आज माडग्याळ मेंढी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात चांगली मागणी होत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी माडग्याळ मेंढी पैदास झाली. त्या ठिकाणी येऊन माडग्याळ मेंढ्या खरेदी केल्या. खूप चांगल्या पद्धतीने देखण्या मेंढ्या मेंढपाळ यांनी सांभाळले आहेत. ही मेंढी जागतिक पातळीवर देखील पोहचली आहे. या जातीचे संशोधन केंद्र जत तालुक्यात होण्याची गरज आहे.

यावेळी बोलताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे म्हणाले, आमच्या तालुक्यातील कोणीकोनुर सारख्या छोट्याशा गावात माडग्याळ मेंढीचे चांगल्या पद्धतीने संवर्धन केले आहे. त्यामुळे पाटीयांनी आज आमच्या तालुक्यात घेऊन जातिवंत माडग्याळ मेंढी ची खरेदी केली. यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रास्ताविक माजी चेअरमन ज्ञानेश्वर आटपाडकर यांनी केले. एस.के.फिशचे मालक संजय कांबळे कार्यक्रमाचे योग्य पद्धतीने नियोजन केले. यावेळी अंकुश कोळकर नवनाथ मस्के, भारत खांडेकर, सिकंदर पटाईत, समाधान पडळकर, भानुदास राजगे रियाज शेख उपस्थित होते.

Related Stories

गीता सुतार, आनंदा देवमाने यांना संधी; भाजपमध्ये उमेदवारीवरुन अंतर्गत कलह

Abhijeet Shinde

बहे-फार्णेवाडीत दहा एकर ऊस जळून खाक

Sumit Tambekar

सांगली जिल्ह्यात सहा जणांचा बळी, विक्रमी 354 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

सांगली : पारे येथे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 22 लोकांवर गुन्हा

Abhijeet Shinde

रंगभूमी दिन उत्साहात साजरा

Abhijeet Shinde

मिरज पंचायत समिती सभापतीपदी त्रिशला खवाटे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!