तरुण भारत

अफगाणिस्तानात परतला लादेनचा सहकारी

पाकिस्तानात 20 वर्षांपासून वास्तव्य

अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जानंतर क्रूर दहशतवाद्यांची देखील वापसी सुरु झाली आहे. अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा अत्यंत जवळचा सहकारी आणि शस्त्रास्त्र पुरवठादार अमीन उल हक 20 वर्षांनी अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील स्वतःच्या घरी परतला आहे. 9/11 हल्ल्यानंतर लादेन तोराबोराच्या गुहांमध्ये लपला होता. त्यावेळी अमीन देखील त्याच्यासोबत होता. त्यानंतर तो पाकिस्तानात गेला होता. हक एका आलिशान कारमधून नांगरहारमध्ये परतला असता त्याच्या समर्थकांनी त्याचे स्वागत केले आहे. अमीनच्या ताफ्यात काही तालिबानी दहशतवादी देखील सामील होते.

Advertisements

वेळ महत्त्वपूर्ण

अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याच्या एक दिवस अगोदर अमीन परतला आहे. अमीन परतल्यामुळे अल-कायदा पुन्हा एकदा शक्तिशाली होऊ शकते. अमीन अफगाणिस्तानात परतण्यासंबंधी पेंटागॉनला प्रश्न विचारण्यात आला असता हा इंटेलिजेन्सचा विषय असून यावर आताच टिप्पणी करणार नसल्याचे उत्तर देण्यात आले.

चित्रफित प्रसारित

अमीनच्या घरवापसीची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो एका पांढऱया रंगाच्या आलिशान कारमध्ये दिसून येतो. समर्थकांच्या गर्दीसह तो घरी पोहोचत असल्याचे दिसून येते. अमीनला लादेन आणि अल-कायदाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार मानले जायचे. 2008 मध्ये त्याला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. लादेन मारला गेल्याच्या सुमारे 6 महिन्यांनी त्याची मुक्तता करण्यात आली होती. पाकिस्तानी तपास यंत्रणांना अमीनविरोधात कुठलाच पुरावा सादर करता आला नव्हता. हक अनेक वर्षांपर्यंत लादेनसोबतच राहिला होता आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होता. तोराबोराच्या गुहांमधून तो लादेनसोबतच पळाल्याचे मानले जाते.

सोव्हियत संघाविरोधात संघर्ष

अमीनने अल-कायदामध्ये सामील होण्यापूर्वी 1980 च्या दशकात सोव्हियत संघाच्या विरोधातील युद्धात भाग घेतला होता. अमेरिकेने 2001 मध्ये जागतिक दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध केली होती आणि यात अमीनचे नाव सामील होते. अल-कायदा पुढील 18-24 महिन्यांमध्ये पुन्हा मजबूत होऊ शकते आणि ही संघटना जगासाठी पुन्हा धोकादायक ठरणार असल्याचे गुप्तचरांच्या अहवालात म्हटले गेले आहे.

Related Stories

चीनचे सुखोई-35 विमान तैवान हद्दीत कोसळले

datta jadhav

कॅलिफोर्नियात जलसाठा 40 वर्षांच्या नीचांकी स्तरावर

Patil_p

हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

datta jadhav

कोरोनावर फिनलंडची मात

Patil_p

अमेरिकन सैन्याकडून 3200 नागरिकांची सुटका

datta jadhav

अजबच!, सहारा वाळवंटच गोठले

Patil_p
error: Content is protected !!