तरुण भारत

सातारा जिल्हयाचा नावलौकिक देशभर करुया

आमदार पृथ्वीराज चव्हाण -अभियान नियोजनासाठी काँग्रेस कमिटीत बैठक

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा जिल्हा हा क्रांतिकारकाचा असून देशाच्या स्वातंत्र लढय़ातील तीन जिह्यापैकी  एक आपला सातारा आहे. हा इतिहास पुढील पिढीला माहिती व्हावा, यासाठी काँग्रेसने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ ’यर्थ न हो बलिदान….चलो बचावो संविधान’ या अभियानाचा कार्यक्रम राष्ट्रीय व राज्यस्तरावर करून जिह्याचा नावलौकिक देशभर करूया असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी बोलताना केले.

वडूज येथे 9 सप्टेंबरला होणाऱया हुतात्मा दिनानिमित्त ’व्यर्थ न हो बलिदान, चलो बचावो संविधान’ या अभियानांतर्गत कार्यक्रम सातारा जिल्हा काँग्रेसच्यावतीने आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक आ. चव्हाण यांच्या उपस्थितीत डॉ सुरेशराव जाधव अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  याप्रसंगी ते बोलत होते.

चव्हाण पुढे म्हणाले, हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील व देशातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम देशभर राबवून स्वातंत्र्याचा इतिहास व सातारा जिह्यात स्वातंत्र्य लढय़ातील योगदान तरुण पिढीला समजण्यासाठी काँग्रेसकडून वर्षभर आयोजन केले आहे, त्यासाठी सर्वानी हा कार्यक्रम यशस्वीपणे करूया असे शेवटी सांगितले. हा कार्यक्रम वडूज येथे होणार असून त्याची सर्व जबाबदारी स्वागताध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी घेतली आहे.

 या बैठकीला ऍड. उदयसिंह पाटील, विजयराव कणसे, अजित पाटील चिखलीकर, हिंदुराव पाटील, अशोकराव गोडसे, राजेंद्र शेलार, प्रदीप जाधव, मनोहर शिंदे, रजनी पवार, धनश्री महाडिक, मनोजकुमार तपासे, झाकीर पठाण, नरेश देसाई, अन्वर पाशाखान, संदीप चव्हाण, ऍड धनावडे आदी तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

दरवाजे तोडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

Abhijeet Shinde

शिवसेनेचे जिह्यात पाहिले महिला संपर्क कार्यालय

Patil_p

शिरोळमध्ये तीन पानी जुगार अड्ड्यावर धाड; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त चौघे ताब्यात

Abhijeet Shinde

सातारा : बोरणे घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

Abhijeet Shinde

पुण्यासारख्या ठिकाणी लॉकडाऊन करा ; मुंबई हायकोर्टाची मुख्यमंत्र्यांना सूचना

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5,557 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!