तरुण भारत

व्हॉट्सअ‍ॅपकडून ४६ दिवसात ३० लाख अकॉउंट बंद

टीम/ऑनलाईन

व्हॉट्सअ‍ॅपने दाखल केलेल्या रिपोर्टमध्ये जून-जुलै दरम्यान ३० लाखाहून अधिक अकॉउंटवर कारवाई केल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप ने घडणाऱ्या गैरप्रकाराविरोधात ही कारवाई करत अकॉउंट बंद केली आहे. भारतात जवळपास ५५ कोटी नागरिक व्हॉटअ‍ॅपचा वापर करतात. अन्य कंपन्यांप्रमाणे व्हॉटअ‍ॅप सोशल मीडिया अ‍ॅपही नव्या आयटी नियमाअंतर्गत येते. या कायद्यानुसार भारतातील सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला यूजर्स सेफ्टी रिपोर्ट सरकारला द्यावा लागतो. व्हॉटअ‍ॅपने दाखल केलेल्या रिपोर्टमध्ये जून-जुलै दरम्यान ३० लाखाहून अधिक अकॉउंटवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने ऑनलाइन स्पॅम आणि गैरवर्तनाविरोधात ही कारवाई केली आहे. फॉरवर्ड मेसेजेससाठी अ‍ॅपच्या गैरवापरसह विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ऑटोमॅटिक टूलद्वारे कारवाई करण्यात आली आहे. जूनपासून जुलैपर्यंत जवळपास ३० लाख २७ हजार अकॉउंट बंद केली आहेत. या कालावधीत ३१६ खाती ब्लॉक करण्यात आली आहेत. युजर्सच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर ७३ खात्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. ४६ दिवसात युजर्सकडून ५९४ तक्रारी प्राप्त झाल्या असून ३१६ अकॉउंटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Advertisements

Related Stories

रवींद्रनाथ टागोरांच्या ‘त्या’ वास्तुची होणार विक्री; खरेदीसाठी ममता सकारात्मक

triratna

लावाचे 2 फिचर फोन्स भारतात दाखल

Patil_p

कोरोनामुळे यंदाही हज यात्रेचे सर्व अर्ज रद्द

triratna

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट : मंगळवारी 60,212 नवे रुग्ण

Rohan_P

भारतीय कंपनी करणार 127 देशांना ‘रेमडेसिवीर’ औषधांचा पुरवठा

datta jadhav

२ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्देश मिळण्याची शक्यता : मुख्यमंत्री बोम्माई

triratna
error: Content is protected !!