तरुण भारत

अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा लावण्यात शितपवाडीची बाजी

ओटवणे/ प्रतिनिधी-

दिल दोस्ती गृप सिंधुदुर्ग आयोजित राजमाता अहिल्याबाई होळकर याची प्रतिमा जिल्ह्यातील धनगरवाडीत घरोघरी प्रथम लावण्यात सरमळे येथील शितपवाडीने बाजी मारली. त्यामुळे दिल दोस्ती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी सरमळे शितपवाडीत जाऊन या वाडीचा रोख रकमेसह गौरव केला.

Advertisements


राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाची धनगर समाजामध्ये माहिती होऊन त्यांच्या कार्याची समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने दिल दोस्ती ग्रुपने जिल्ह्यात प्रथम धनगरवाडीत घरोघरी अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा लावेल त्या वाडीचा रोख रकमेसह गौरव करण्याचे जाहीर केले होते. सरमळे शितपवाडीतील तरुण तडफदार युवा नेतृत्व संदीप जंगले यांच्या पुढाकाराने या वाडीत घरोघरी अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा लावण्यात आली.


या कार्यक्रमात दिल दोस्ती गृपचे अध्यक्ष महादेव खरात यानी गृपचा उद्देश स्पष्ट करताना गरीब व गरजू होतकरू कूटूंबाना मदत करण्याचा मानस असल्याचे सागितले. यावेळी भैरू पाटील यानी अहिल्याबाई होळकर यांचे कार्य व जीवनपट उलघडून सांगितला. यावेळी धनगर समाजातील जेष्ठ नागरीक जानू विठू जंगले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी गृपचे सचिव रमेश शिंदे, सदस्य राजू ताटे, राजेश जानकर, शेखर डोईफोडे, लकी डोईफोडे, लक्ष्मण पाटील, विनोद कोळेकर, दिपक ताटे, बळीराम कोकरे, सूरेश ताटे आणि शितपवाडीतील मोठ्या ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप जगले, सूत्रसंचालन नामदेव जंगले, तर आभार राजू ताटे यानी मानले.

Related Stories

महाविद्यालय-सीईटी परीक्षा होणार नव्या वेळापत्रकानुसार

Patil_p

पगार न मिळाल्याने शिक्षकांच्या दिवाळीवर विरजण

Abhijeet Shinde

केळशीत समुद्रात पर्यटकांची गाडी बुडाली!

Patil_p

अखेर तीन दिवसानंतर मनसे चे आमरण उपोषण मागे

Abhijeet Shinde

धपोली रुग्णालय इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

Patil_p

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक भास्कर सावंत यांचे निधन

NIKHIL_N
error: Content is protected !!