तरुण भारत

‘शक्तीपंप’ला अधिकचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा

मुंबई 

 सौर जलपंप पूनर्निमिती शक्तीपंपला अपेक्षा आहे, की शेतकऱयांकडून उत्पादनांची मागणी वाढत गेल्यास चालू आर्थिक वर्षात उत्पन्न दुप्पट होत, अधिक वेगाने वाढत जात 2 हजार कोटी रुपयांवर पोहोचणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Advertisements

सौरजल पंपासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून सबसिडी 90 टक्क्यांपर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे उत्पन्न आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 930 कोटी रुपये होते, जे त्याच्याही मागच्या वर्षाच्या तुलनेत तीन पट राहिले आहे.

शक्तीपंपने देशात पहिल्यांदाच बीईई 5 स्टार पंपांची पूनर्निमिती केली आहे, ही देशातील पहिली कंपनी असून 100 टक्के स्टेनलेस स्टील पंप आणि ऊर्जा कुशल मोटर्सची निर्मिती कंपनीने केली असल्याची माहिती आहे.

मागील वर्षात उत्पन्नात 560 कोटी रुपये सौर इंजिनिअरिंग, खरेदी आणि निर्मिती व्यवसायासह निर्यातीमधून 180 कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचे शक्तीपंपचे अध्यक्ष दिनेश पाटीदार यांनी सांगितले आहे.

दक्षिणेत विक्री अधिक 

भारताच्या दक्षिणेकडील बाजारात विशेष रुपाने तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कंपनीची उत्पादने विक्री अधिक झाली आहेत.

Related Stories

शेअर बाजार घसरणीसह बंद

Patil_p

मोटोरोला फोल्डेबल 5 जी फोन सादर करण्याच्या तयारीत

Patil_p

हवाई प्रवास दर जैसे थे

Patil_p

गो एअरचा आयपीओ ऑगस्टमध्ये येणार

Patil_p

सप्टेंबरमध्ये इंधन मागणी वाढली

Omkar B

ऍक्सेंचरकडून 5 टक्के कर्मचारी कपात

Patil_p
error: Content is protected !!