तरुण भारत

बांगलादेशचा न्यूझीलंडला दे धक्का

हिल्या टी-20 सामन्यात 7 गडी राखून नमवले, मुस्तफिजूरचे 13 धावात 3 बळी

मिरपूरच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर अवघ्या 60 धावात खुर्दा करत बांगलादेशने न्यूझीलंडला पहिल्या टी-20 सामन्यात एकच जोरदार धक्का दिला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. बांगलादेशचा हा न्यूझीलंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमधील पहिलाच विजय ठरला. प्रारंभी, न्यूझीलंडचा डाव 16.5 षटकात सर्वबाद 60 धावांमध्ये गुंडाळला तर प्रत्युत्तरात बांगलादेशने 15 षटकात 3 बाद 62 धावांसह सहज विजय संपादन केला.

Advertisements

न्यूझीलंडतर्फे लॅथम व निकोल्स यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. मात्र, त्यांचा डाव सातत्याने कोसळत राहिला आणि निर्धारित 20 षटकांचा कोटाही पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले. बांगलादेशतर्फे मुस्तफिजूरने 13 धावात 3 तर नसूम (2-5), शकीब हसन (2-10), सैफुद्दिन (2-7) यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत न्यूझीलंडच्या डावाला चांगलेच खिंडार पाडले.

प्रत्युत्तरात मोहम्मद नईम (1) व लिटॉन दास (1) स्वस्तात बाद झाल्याने बांगलादेशची देखील 2 बाद 7 अशी खराब सुरुवात झाली होती. मात्र, शकीब हसन (25), मुश्फिकूर रहीम (नाबाद 16), महमुदुल्लाह (नाबाद 14) यांनी संघाला विजयाप्रत नेले. किवीज संघातर्फे एजाज पटेल, कोल मॅकोन्ची, रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड ः 16.5 षटकात सर्वबाद 60 (टॉम लॅथम 25 चेंडूत 18, हेन्री निकोल्स 24 चेंडूत 18. मुस्तफिजूर 2.5 षटकात 13 धावात 3 बळी, नसूम अहमद, शकीब हसन, सैफुद्दीन प्रत्येकी 2 बळी, मेहिदी हसन 1-15).

बांगलादेश ः 15 षटकात 3 बाद 62 (शकीब हसन 33 चेंडूत 2 चौकारांसह 25, मुश्फिकूर रहीम 26 चेंडूत नाबाद 16, महमुदुल्लाह 22 चेंडूत नाबाद 14. एजाज, रचिन, कोल प्रत्येकी 1 बळी)

Related Stories

कोव्हिड बदली खेळाडू, लाळबंदीवर आयसीसीचे शिक्कामोर्तब

Patil_p

महिला हॉकी संघाचे स्वप्नभंग; कांस्यपदक लढतीत ग्रेट ब्रिटनकडून पराभव

Rohan_P

भारतीय महिलांची सलामी पाकिस्तानशी

Amit Kulkarni

युरो 2020 सर्वोत्तम संघात इटलीचे पाच खेळाडू

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचे तीन क्रिकेटपटू आयसोलेशनमध्ये

Patil_p

ट्रिनबॅगो नाईट रायडर्सचा सलग सहावा विजय

Patil_p
error: Content is protected !!