तरुण भारत

गुंजी माउलीदेवी मंदिर दसरोत्सवापूर्वी पूर्णत्वाकडे

वार्ताहर /गुंजी

येथील सुप्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री माउलीदेवी मंदिराचा जीर्णोद्धार दशकापूर्वी सुरू झाला होता. शासकीय निधीबरोबरच देणगीदारांच्या व भाविकांच्या मदतीने हे मंदिर टप्प्याटप्प्याने आकार घेत आहे.

Advertisements

सुरुवातीच्या काळात तत्कालीन आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. माजी आमदार अरविंद पाटील यांनीही आपल्या कार्यकाळात मंदिराला यथाशक्ती सहकार्य केले व त्यानंतर आता आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकरही या मंदिराच्या उर्वरित कामासाठी झटत आहेत. सध्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी अंतर्गत सजावट, मंदिराचे रंगकाम व इतर काम अद्याप शिल्लक आहे. गेल्यावषी आमदार अंजलीताईंच्या सहकार्यातून मंदिरापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतचे गटार व रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

कोरोना काळ सुरू झाल्यानंतर मंदिराच्या देणगीदारांमध्ये खंड पडला होता. त्यामुळे मंदिराचे काम मंदावल्याने बांधकाम कमिटीसमोर पेचप्रसंग उद्भवला. याची माहिती आमदार अंजली निंबाळकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी स्वतः मंदिराला भेट देऊन माउली देवीचे दर्शन घेतले व मंदिराची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मंदिराचे उर्वरित काम येत्या दसरोत्सवापूर्वी पूर्णत्वास नेण्याची ग्वाही देऊन या मंदिरासाठी वैयक्तिकरीत्या मंदिरातील फरशी कामासाठीचा खर्च व शासकीय निधीतूनही मदत जाहीर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम कमिटीचे अध्यक्ष राजाराम देसाई होते.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून ग्रामस्थांच्यावतीने आमदारांचा शाल, श्रीफळ व माउली देवीचा फोटो देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी गुंजी गावामध्ये आजपर्यंत जवळजवळ सव्वाकोटीची कामे पूर्ण केली असल्याचे सांगून लवकरच गेल्या दशकापासून रखडलेल्या साई कॉलनीतील विजेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर खानापूर-रामनगर रस्त्याच्या कामाचा आपण वेळोवेळी पाठपुरावा करीत असून सध्या सुरू असलेल्या पाच कोटीच्या दुरुस्तीबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त करून सदर कंत्राटदाराला जाब विचारणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून दरवषी यात्रोत्सव काळात व मंदिराच्या इतर कामात वेळोवेळी सहकार्य करणारे खानापूरचे सुपुत्र महेश कोडोळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजाराम देसाई, खेमाण्णा घाडी, रामा मादार यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास सूर्यकांत कुलकर्णीसह गुंजीतील अनेक नागरिक पंच, पुजारी, ग्राम पंचायत सदस्य, सर्व कार्यकर्ते, महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गुंडू करंबळकर यांनी केले.

Related Stories

एसपीएम रोडवर कारच्या काचा फोडल्या

Amit Kulkarni

वन्यजीवांसाठी उद्योग खात्रीतून धरणाची निर्मिती

Patil_p

‘प्रयत्न’तर्फे वस्त्रप्रावरण-हस्तकला प्रदर्शन-विक्रीचे उद्घाटन

Patil_p

जिलेटिनच्या भीषण स्फोटात पाच ठार

Amit Kulkarni

देवीची आकर्षक आरास

Patil_p

बेंगळूरमध्ये लवकरच होणार ऑनलाईन मद्य विक्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!