तरुण भारत

मधूमेहीनि दूध प्यावे का

मधुधेमह रुग्णांच्या मनात दूध प्राशन करावे की नाही, याबाबत संभ्रम असतो.

  • कोलंबिया आशिया रुग्णालयातील आहार तज्ञ डॉक्टर शालिनी गार्व्हिन ब्लिस यांच्या मते, दुधाचे सेवन हे मधुमेहाच्या स्थितीवर अवलंबून असेल. तसेच  मधुमेहाची तीव्रता किती आहे, हे देखील तपासणे गरजेचे आहे.
  • गायीचे दूध हे टाइप 1 मधुमेह असणार्या व्यक्तींसाठी पोषक ठरत नाही. तज्ञांच्या मते, गायीच्या दुधातील काही प्रोटिन टाइप वन मधुमेह असणार्यांसाठी हानीकारक ठरू शकतात. उदा.  ए 1 बीटा कॅसिन मॉलिक्यूल. हा घटक पचवताना त्रास होतो. त्याचबरोबर  या दुधात बोविन इन्सूलिन देखील असते. ते ऑटोइम्यून रिऍक्शनला ट्रिगर करतो. या कारणामुळे आपले शरीर बिटा सेल्सला अँटीबॉडीज करू लागतात.
  • याच सेल्समधून इन्सूलिनची निर्मिती होत असते. हे नष्ट झाल्यास टाइप वनचा मधुमेह हा अधिक गंभीर होऊ शकतो.
  • याउलट फूल फॅट दुधातील ट्रान्स पेल्मिटोलिक ऍसिड हे इन्सूलिनची पातळी वाढवण्याचे काम करते. अमेरिकन डायबिटिज कौन्सिलच्या एका संशोधनात म्हटले की,  या दुधामुळे शरिरावर सूज येण्याचा धोका कमी राहतो.
  • सुमारे 65 टक्के लोक लॅक्टोज इंटोलेरेंट असतात. यात दूध प्राशन केल्यानंतर पचनासंबंधीचे विकार सुरू होतात. त्यामुळे आपणही त्यापैकी एक असाल तर दूध पिण्याचे टाळावे.
  • मधुमेह असताना दूध सेवन करत असाल तर काहीवेळा आपल्या आतडय़ाची लायनिंग खराब होण्याचा धोका राहू शकतो. यात ऑटो इम्यून रिस्पॉन्स सुरु होईल. या कारणामुळे शरीर इन्सूलिनचा योग्य तर्हेने वापर करू शकत नाही. परिणामी या स्थितीत दूध पिणे टाळावे.

Related Stories

कॅफिन आणि आरोग्य

Amit Kulkarni

ग्रीन टी की लेमन टी

Omkar B

ट्रेडमिलवर धावताना…

Omkar B

आष्टवक्रासन

Omkar B

अन्न वारंवार गरम करताय?

Omkar B

एन्डोस्कोपीच्या अंतरंगात….

Omkar B
error: Content is protected !!