तरुण भारत

अंडी खा पण

अंडे हे एक हेल्दी फूड आहे. विशेषतः वाढत्या वयाच्या मुलांसाठी तर अंडी आवश्यक आहेत. दररोज अंडी खाल्ल्याने शरिरातील प्रोटीनची कमतरता दूर होते.

  • अंडय़ात प्रोटीन, आयरन, व्हॅटॅमिन ए, बी 6, बी 12, फोलेट, एमिनो ऍसिड, फॉस्फोरस, सेलेनियम, ऍसेंशियर अनसॅच्यूरेटेड फॅटी ऍसिडससारखे लिनोलिक आणि ओलिक ऍसिड आढळून येतात.
  • असे असले तरी नेहमी उकडलेले संपूर्ण अंडे प्राशन करायला हवे. काही जण अंडय़ाचा पिवळा भाग काढून टाकतात. त्याच्या सेवनाने वजन वाढते, असा भ्रम असतो. म्हणून ते केवळ पांढरा भागच खातात. परंतु ही बाब चुकीची आहे.
  • अंडय़ात कोणत्याही प्रकारचे फॅटी ऍसिडस् नाहीत. त्यामुळे आरोग्यदायी व्यक्तींनी पिवळा भाग देखील खाणे गरजेचे आहे.
  • अंडे खाण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळ. सकाळच्या न्याहारीत उकडलेल्या अंडय़ांचा समावेश करावा.
  • आम्लेट किंवा मसालेदार भाजी तयार केल्याने अंडय़ातील पोषक घटक संपतात. म्हणूनच कोणत्याही प्रकारचे तेल, तूप यांचा समावेश न करता अंडय़ाचे सेवन करावे.
  • अंडय़ांपासून बनवलेल्या ऑम्लेटमुळे कॉलेस्ट्रॉल कमी होण्याऐवजी वाढतात. म्हणूनच अंडी उकडूनच खावीत. 

Related Stories

सतत मास्क वापरताय

Amit Kulkarni

पोटावरील चरबी कमी करायचीय ?

Amit Kulkarni

कोरोना संसर्ग आणि दमटपणा

Omkar B

जपा किडनीचे आरोग्य

tarunbharat

फायदे उस्टसानाचे

Amit Kulkarni

यकृतदाह

Omkar B
error: Content is protected !!