तरुण भारत

मेडिटेशन आणि एकग्रता

सध्याच्या धकाधकीच्या काळात मनारोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. नैराश्य हे सध्याच्या ताणतणावांनी भरलेल्या जीवनशैलीचे टोक असले तरी मधल्या टप्प्यांमध्ये अनेक मनोविकार जडत आहेत. अगदी एकाग्रता हरपलेल्यांची संख्याच पाहिली तर तीही मोठी दिसून येईल. वास्तविक, यावर ध्यानधारणा अर्थात मेडिटेशन हा अक्सीर इलाज आहे.

  • अलीकडेच झालेल्या एका संशोधनातून पुन्हा एकदा ही बाब स्पष्ट झाली आहे.
  • यासाठी संशोधकांनी तब्बल आठ आठवडे रोज मेडिटेशन करणार्या 10 विद्यार्थ्यांवर अभ्यास केला. हे विद्यार्थी आठवडय़ातून पाच दिवस रोज दहा मिनिटे मेडिटेशन करत होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या ब्रेनचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यात मेडिटेशननंतर या मुलांच्या ब्रेनमध्ये एकाग्रता निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. 
  • न्यूयॉर्कच्या बिंगहॅम्प्टन यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. एकाग्रतेने विचार करण्याच्या आणि ध्यान धारणा करण्याच्या दोन कनेक्शनला मेडिटेशन जोडते. एखादी व्यक्ती मन लावून काम करते तेव्हा ही दोन कनेक्शन काम करत असतात. अल्झायमर आणि ऑटिझमचे कनेक्शनसुद्धा याच नेटवर्कने होते, असे संशोधकांचं म्हणणे आहे.
  • या संशोधनातील जॉर्ज वेंसचेंक सांगतात की, मेडिटेशननंतर या विद्यार्थ्यांची एमआरआय चाचणी करुन मेंदूचा पॅटर्न समजून घेण्यात आला. मेडिटेशन पूर्वी याविद्यार्थ्यांचा मेंदू एकाग्र नसल्याचे दिसून आले होते; पण नंतर तो एकाग्र झाल्याचं पाहायला मिळाले.  

Related Stories

N-95 मास्क कोरोना विषाणूचे संक्रमण रोखू शकत नाही

datta jadhav

ट्रान्सफॅटचा धोका

Amit Kulkarni

इलेक्ट्रॉनिक डस्टपासून जपा

Amit Kulkarni

नटराजासन

Omkar B

पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढेल

Amit Kulkarni

व्हेरिकोज व्हेन्स

Omkar B
error: Content is protected !!