तरुण भारत

पियाजिओ इंडियाकडून सुपरबाईक सादर

मुंबई  : पियाजिओ इंडियाने आपली नवीन सुपरबाईक सादर केली आहे, ज्यामध्ये अप्रलिया आरएस 660, टय़ूनो 660, अप्रिलिया आरएसव्ही4, टय़ूनो व्ही4 आणि प्रसिद्ध मोटो गुज्जी व्ही 85 टीटी यांचा समावेश आहे. सदर सुपरबाईकची किमत ही 13.09 लाख रुपयांपासून 23.69 लाख रुपयांपर्यंत राहणार असल्याचे पियाजिओ इंडियाने सांगितले आहे.

प्रीमियम व्हेस्पा स्कूटरची निर्मिती करणारी कंपनी पियाजिओ इंडिया इटलीची प्रमुख वाहन कंपनी पियाजिओ समूहाच्या संपूर्ण मालकीची आहे. तसेच हीच कंपनी दुचाकीसाठी भारतामध्ये सर्व मोटोप्लेक्स डीलरशीपकरीता ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

Advertisements

वेगळा अनुभव देणार

सादर करण्यात आलेली सुपरबाईक भारत आणि जगभरात मोठय़ा प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करत आहे. भारतीय ग्राहकांची जीवनशैली लक्षात घेत आम्ही दुचाकी चालविण्यासाठी एक नवा अनुभव देणार असल्याचे अध्यक्ष डिएगो ग्रॅफी यांनी म्हटले आहे.

Related Stories

ओला ई-स्कूटरच्या ड्रायव्हिंग चाचणीस प्रारंभ

Patil_p

हय़ुंडाई क्रेटाची निर्यात 2 लाखाच्या घरात

Patil_p

दमदार फिचर्ससोबत हिरोची ‘एक्स्ट्रीम 200 एस’ दाखल

Omkar B

मर्सीडिझ कार्सच्या वाढवणार किंमती

Patil_p

3-रो एमजी हेक्टर प्लस भारतीय बाजारात

Patil_p

एलएमएलची येणार इलेक्ट्रिक दुचाकी

Patil_p
error: Content is protected !!