तरुण भारत

सांगली : कुपवाड घरफोडी प्रकरणी चोरट्यास अटक, ७६ हजाराचे दागिने हस्तगत

कुपवाड / प्रतिनिधी

कुपवाडमधील हनुमाननगर भागात बंद घराच्या दरवाजाचे कुलुप काढून अज्ञात चोरट्यांनी ७६ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले होते.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कुपवाड पोलिसांनी छडा लावून संशयित वैभव बसवेश्वर सन्नकी (१९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, कुपवाड) या चोरटयास अटक केली. त्याच्या ताब्यातील एक सोन्याची चेन, नेकलेस, अंगठी व बदाम मिळून ७६ हजार ५०० रुपये किंमतीचे सर्व दागिने हस्तगत केले. त्याला गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवस पोलिस कोठड़ीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने सुनावला. याबाबत दत्तात्रय मारुती साळुंखे (३५, मुळगाव अंजणी ता.तासगाव) यांनी फिर्याद दिली होती.

Advertisements

Related Stories

संस्थान गणपतीची पारंपरिकरित्या उत्साहात स्थापना

Abhijeet Shinde

कृष्णा पात्रातील दोन दुर्मिळ हरणटोळ सापास जीवदान

Abhijeet Shinde

सांगली : चार खासदार असलेल्या पक्षाचा नेता लोकनेता

Abhijeet Shinde

मिरज आगारातून एसटीची चाके हलली

Sumit Tambekar

सांगली : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले शेकडो हात

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाने दोन बळी, नवे रूग्ण २३

Abhijeet Shinde
error: Content is protected !!