तरुण भारत

‘गंगूबाई काठियावाडी’मधील इंटिमेट सीन हटविणार

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा निर्णय

संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाई ही मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे. या चित्रपटात गंगूबाई आणि त्यांचा प्रियकर यांच्यात एक इंटिमेट सीन होता, मात्र चित्रपटातील आलिया भट्ट आणि तिचा ऑनस्क्रीन प्रियकर शांतनू माहेश्वरी यांच्यामधील हा इंटिमेट सीन दिग्दर्शक भन्साळी काढून टाकणार आहेत. वाद टाळण्यासाठी भन्साळी हे पाऊल उचलणार असल्याचे समजते. दरम्यान आलियाने या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. तसेच निर्मात्यांनी देखील चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित न करण्याच्या निर्णयावर निर्माते ठाम असल्याने प्रेक्षकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटाकरता निर्मात्यांनी मोठा खर्च केला असल्याने ते चित्रपटगृहांमध्येच तो प्रदर्शित करू पाहत आहेत.

Advertisements

Related Stories

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

ऋषी सक्सेनाची नवी वेबसीरीज

Patil_p

क्रितीने पूर्ण केले ‘मिमी’चे शूटिंग

tarunbharat

पोलिसांचे महत्त्व सांगणारा ‘कवच’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

datta jadhav

बिग बॉसमध्ये मराठीचा अपमान; कलर्सने उध्दव ठाकरेंची मागितली माफी

Rohan_P

राज ठाकरे यांच्या हस्ते 8 दोन 75

Patil_p
error: Content is protected !!