तरुण भारत

रशियातील युद्धाभ्यासात भारत सामील

चीन अन् पाकिस्तानच्या सैन्याचाही असणार सहभाग

वृत्तसंस्था /मॉस्को

Advertisements

रशियाच्या निझनिय भागात 17 देशांचे सैन्य स्वतःचे सामर्थ्य दर्शविणार आहे. 3 सप्टेंबरपासून 16 सप्टेंबरपर्यंत चालणाऱया ‘जपड 2021’ युद्धाभ्यासात भारत, चीन आणि पाकिस्तान समवेत युरेशिया आणि दक्षिण आशियातील 17 देशांचे सैनिक युद्धकौशल्याचे सादरीकरण करणार आहेत.

भारतीय सैन्याने यापूर्वी देखील शांघाय सहकार्य संघटनेकडून आयोजित युद्धाभ्यासात चीन आणि पाकिस्तानच्या सैन्यासोबत युद्धकौशल्य प्रदर्शित केले होते. मे 2020 मध्ये लडाखमध्ये चीनसोबत हिंसक झटापट झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि चीनचे सैन्य एकत्रिपणे युद्धाभ्यास करणार आहे. रशियाकडून आयोजित या बहुराष्ट्रीय सैन्याभ्यासाचा उद्देश दहशतवादविरोधी सहकार्य वाढविणे आहे.

भारतीय सैन्याची 200 सैनिकांची तुकडी 3-16 सप्टेंबरपर्यंत होणाऱया युद्धाभ्यासात भाग घेण्यासाठी रशियात पोहोचली आहे. ही बटालियन नागा रेजिमेंटची असल्याचे समजते.

याचदरम्यान भारत आणि कजाकस्तानच्या सैन्याने बुधवारी 13 दिवसीय युद्धाभ्यास सुरू केला आहे. ‘काजिंद-21’ हा युद्धाभ्यास कजाकस्तानच्या नोड आइशा बीबी भागात सुरू झाला आहे. भारतीय सैन्याच्या बिहार रेजिमेंटचे एकूण 90 सैनिक यात सामील झाले आहेत.

जपड 2021 युद्धाभ्यासात युद्धाच्या सर्व पैलूंचा सराव केला जाणार आहे. चिनी सैन्यासोबत मैत्री बळकट होत असताना रशियाकडून या युद्धाभ्यासाचे आयोजन होत आहे. जपड 2021 च्या अंतर्गत काही दिवसांपूर्वी रशिया आणि चीनच्या 10 हजार सैनिकांनी युद्धाभ्यास केला होता.

या युद्धाभ्यासाकडे अमेरिकेसाठी धोक्याचा इशारा म्हणून पाहिले गेले होते. तसेच चीन आणि रशियाच्या सैन्याने यावेळी अनेक घातक अस्त्रांचे प्रदर्शन केले होते. शत्रूदेशाच्या विरोधात एकत्रितपणे लढणे हा युद्धाभ्यासाचा उद्देश होता.

Related Stories

तालिबानकरता पाक विदेशमंत्र्यांची भ्रमंती

Patil_p

कोरोना प्रतिबंधासाठी नवी पद्धत शोधण्यास यश

Patil_p

नेपाळचा नवीन नकाशा कायम राहणार

datta jadhav

‘त्या’ जहाजामुळे होतेय ताशी 2800 कोटींचे नुकसान

datta jadhav

ऑस्ट्रेलियात उंदिर महामारी घोषित

Patil_p

‘डेल्टा’विरोधात फायझर, मॉडर्नाचा प्रभाव कमी

datta jadhav
error: Content is protected !!