तरुण भारत

सेनॉर चौकास हिंदूसुर्य महाराणा प्रताप यांचे नाव द्या

शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

गेली 22 वर्ष सातारा पालिकेच्या परवानगीने याथल नागरिक या चौकात शुरवीर महाराणा प्रताप गणेशोत्सव मंडळ या नावाने गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळतो. या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केली आहेत. या चौकाला शुरवीर महाराणा प्रताप यांचे नाव देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी विनंती शिवसेनेच्यावतीने निवेदनाद्वारे नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे करण्यात आलेली आहे.

निवेदन देताना सातारा शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेली 22 वर्ष त्या चौकात शुरवीर महाराणा प्रताप गणेशोत्सव मंडळ विविध उपक्रमांनी गणेशोत्सव पालिकेच्या परवानगीने साजरा केला जातो. या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे. कोरोना काळात जेवण, सॅनिटायझर, मास्क, रोगप्रतिकारक शक्तीवाढीच्या गोळय़ा वाटप असे कार्यक्रम केले आहेत. त्यामुळे या चौकास राष्ट्रपुरुशा शुरवीर महाराणा प्रताप चौक असे नाव देण्यात यावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

Related Stories

सातारा : सोनगाव वापरलेले पीपीई किट नेणारा ट्रक सामाजिक कार्यकर्ते जयवंत कांबळे यांनी अडवला

Abhijeet Shinde

सातारा : सहा सुलभ शौचालयांचा आराखडा तयार

datta jadhav

कराडला 25 रोजी वऱहाड निघालंय लंडनला

Patil_p

‘कर्तव्य’च्या प्लास्टिक मुक्ती उपक्रमास प्रतिसाद

Patil_p

सातारा शहरात भाजपचे मंदिर उघडा आंदोलन

Abhijeet Shinde

सवयभानकडून साताऱ्यात 20 हजार 777 घरांची तपासणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!