तरुण भारत

’मोफत’ च्या नावाखाली दुप्पट दराने पाणी

प्रमोद सावंत यांचा पाणीजुमला उघड : आप च्या प्रतिमा कुतिन्हो यांची टीका

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

प्रमोद सावंत यांच्या बहुचर्चित मोफत पाणी योजनेसाठी 1 सप्टेंबरकडे डोळे लावून बसलेल्या गोवेकरांना धक्का बसला. ती योजना म्हणजे आणखीन एक जुमला ठरली आहे. सरासरी गोवेकरांच्या पाणी दरात जवळपास 80 टक्मयाने वाढ झाली असून बहुतेक गोमंतकीयांना आता दुसऱया सर्वोच्च स्ल?बमध्ये हलवण्यात आले आहे. सर्वात वाईट म्हणजे मोफत पाणी योजना फक्त काम करणा -या मीटरवर लागू होईल, सदोष किंवा अकार्यक्षम मीटर असलेल्यांना 16 हजार लिटर पर्यंत संपूर्ण रक्कम 3.5 रुपये प्रति युनिटच्या नवीन दराने भरावी लागेल. पूर्वी त्यासाठी 2.5 रुपये प्रति युनिट असा दर होता, अशी टीका आपच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.  बांधकाम अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील घरगुती किमान 1000 लिटर पाणी वापरते, जे दरमहा 30 घनमीटर असते आणि अशा प्रकारे 50 ते 60 टक्के ग्राहक 15 रुपये प्रति घनमीटरच्या टप्प्यात  येतात, जो दुसऱया क्रमांकाचा स्ल?ब आहे. थोडक्मयात जेथे खालच्या टप्प्यातील ग्राहक फक्त थोडी रक्कम वाचवत आहेत तिथे सरासरी गोवेकर सावंत यांच्या अनुदानाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी दुप्पट पैसे देतील .जे बहुतेक गोवेकरांना काहीही उपयोगी नाही.

घरगुती ग्राहकांना सर्वात जास्त फटका बसेल कारण जे 16,001 लीटर वापरतील. म्हणजेच दररोज 533 लिटरपेक्षा जास्त वापरतात त्यांना आता त्यांच्या जुन्या बिलाच्या रकमेच्या जवळपास दुप्पट पैसे द्यावे लागतील. सावंत सरकारने विनामूल्य पाण्याच्या वापरासाठी वरच्या मर्यादेची गणना करण्यामागील आपला तर्क देखील सांगितला केला नाही. ही घोषणा केवळ प्रसिद्धी हेतूंसाठी  केलेली घोषणा आहे. जर सावंत सरकार काही गोवेकरांना मोफत पाणी देऊ शकत असेल तर त्यांना ते सर्व गोवेकरांना देण्यापासून काय रोखत आहे?

हे स्पष्ट आहे की सावंत सरकारने जगासमोर मोठे दावे करताना गोवेकरांना लुटण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. जेव्हा आप सत्तेत येईल तेव्हा आम्ही केवळ गोवेकरांना मोफत पाणी देणार नाही तर आम्ही आमच्या योजनेतून प्रत्येक गोवेनकरांना पाणीपुरवठा होईल याची खात्री करू .आम्ही अवाजवी किंमतींसह जुमला करणार नाही. दिल्लीमध्ये आप सरकार 90 टक्के पेक्षा जास्त दिल्लीकरांना त्यांच्या योजनांमधून फायदा मिळेल याची खात्री करण्यासाठी वापराच्या पद्धतींचा अभ्यास करून प्रत्येक कुटुंबाला 20 हजार लिटर पाणी देते. शिवाय दिल्ली जल बोर्डाने 90 टक्के पेक्षा जास्त दिल्लीला पाईपद्वारे पाणी मिळण्याची खात्री करण्यासाठी काम केले आहे जे लवकरच 100  टक्के होणार आहे.

योजना आणताना हे महत्वाचे आहे की सरकार जास्तीत जास्त लोकांना कशी मदत करते याचे अभ्यास करते. गोवेकर सरासरी किती लिटर वापरतात, सदोष मीटर दुरुस्त करण्याची त्यांची योजना, प्रत्येक गोव्याच्या घरापर्यंत पाईपयुक्त पाणी पोहोचण्याची त्यांची योजना आणि ते टँकरवरील अवलंबित्व कसे संपवतील आणि गोव्याला विशेषतः ग्रामीण गोव्याला त्रास देणारे कोरडे नळ कसे संपवतील या सर्व गोष्टींबाबत सावंत गप्प आहेत.

आता वेळ आली आहे, की सावंत सरकार योग्य पध्दतीने गोवेकरांना त्यांच्या कर रकमेची किंमत मिळेल याची खात्री करणे आवश्यक आहे. गोमंतकीयांना मोफत पाणी आणि इतर सेवा एका विभागाकडून लुटण्याऐवजी एका अनुदानाचे औचित्य सिद्ध केले जे बहुसंख्य गोवेकरांना  मदत करणार नाही. सावंत सरकारने जुमल्यांच्या मागे किमती वाढवण्याचे प्रयत्न करणे बंद केले पाहिजे.

याबाबत आपनेत्या प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की “सावंत सरकारने घाबरून या योजनेची घोषणा करण्यापूर्वी काहीही अभ्यास केला नाही. त्यांनी त्याऐवजी दर जाहीर केले ज्यामुळे गोवेकरांना जास्त बिले भरावी लागतील. यामुळे गोवेकरांवर ओझे वाढेल. फक्त अनुदानाची घोषणा केल्याने बहुसंख्य गोवेकरांना जास्त बिले येणार आहेत. यामुळे त्यांना दिलासा मिळणार नाही.”

Related Stories

तृणमूल सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची पर्तगाळी मठाला भेट

Amit Kulkarni

सरकारच्या भूमी अधिकारीणी विधेयकाला सत्तरी तालुक्मयातून विरोध करणारच.

Amit Kulkarni

मडगाव न्यू मार्केट खुले करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांकडे पत्रव्यवहार

Amit Kulkarni

वादळामुळे ऑर्किड लागवडीचे 8 लाखांचे नुकसान

Amit Kulkarni

पाडव्याच्या मुहुर्तावर मगोची पुनर्बांधणी

Omkar B

कृषी महोत्सवांवरील खर्च अनाठायी

Amit Kulkarni
error: Content is protected !!