तरुण भारत

तलवार घेऊन नाचणे पडले महागात, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी / अक्कलकोट

कोरोना प्रादुर्भावामुळे जमावबंदी आदेश असताना बेकायदेशीर जमाव जमवून हातात तलवार घेऊन नाचल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंग येथील रहिवासी यासीन अब्बास कटरे व सोहेल अलाउद्दीन कटरे या दोन युवकांसह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेले सर्व तरुण यासिन कटरेच्या शेतात आया है राजा लोगो रे लोगो या गाण्यावर लोकांना घेऊन नाचल्यामुळे व व्हिडीओ तयार करून जनसामान्यांत दहशत निर्माण केली. याप्रकरणी या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पो.कॉ. लक्ष्मण काळजे यांनी दिली असून पुढील तपास वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय जमादार अधिक तपास करत आहेत.

Related Stories

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोरोनाचे नियम धाब्यावर

Abhijeet Shinde

सोलापुर : करमाळा शहरात 27 तर ग्रामीण भागात 35 कोरोना पाॅझिटिव्ह

Abhijeet Shinde

34 हजार 184 कोवीडशिल्ड डोस सोलापुरात दाखल

Abhijeet Shinde

पोपटाला बंदिस्त करणे पडले महागात; न्यायालयाने ठोठावला 25 हजाराचा दंड

prashant_c

सोलापूर : ट्रकच्या धडकेत चपळगावचा तरुण ठार, एक गंभीर जखमी

Abhijeet Shinde

सोलापूर : लवकरात लवकर नुकसानीचे पॅकेज जाहीर करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!