तरुण भारत

ऑगस्टमध्ये निर्यात 45 टक्क्यांनी वधारली

वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशातील विविध वस्तूंच्या निर्यातीत ऑगस्ट महिन्यात वर्ष 2020 च्या तुलनेत कामगिरी ही 45.17 टक्क्यांनी मजबूत राहिली असून 33.14 अब्ज डॉलरच्या घरात निर्यात पोहोचली आहे.

प्रमुख क्षेत्रांपैकी इंजिनिअरिंग, पेट्रोलियम उत्पादन, रत्न आणि आभूषणं तसेच रसायन यासारख्या क्षेत्राने मजबूत कामगिरी केली आहे. यामुळे देशातील निर्यात मजबूत स्थितीत राहिली आहे. वाणिज्य मंत्रालयाने प्रारंभीचे आकडे सादर केले असून या आकडेवारीनुसार व्यापारी तोटा वाढून 13.87 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

ऑगस्ट महिन्यात आयात 51.47 टक्क्यांनी वधारुन 47.01 अब्ज डॉलरवर राहिली असून वर्ष 2020 मधील समान तिमाहीत हा आकडा 31.03 अब्ज डॉलर होता. व्यापारी तोटा ऑगस्ट 2020 मध्ये 8.2 अब्ज डॉलर होता. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान ही स्थिती 55.9 अब्ज डॉलर राहिली आहे. एक वर्षाच्या अगोदर 2020-21 मधील समान कालावधीत 22.7 अब्ज डॉलर होती.

चालू आर्थिक वर्ष

चालू आर्थिक वर्षामधील एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान निर्यात 66.92 टक्क्यांनी वाढून 163.67 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

Related Stories

बँकांच्या समभाग विक्रीने बाजारात घसरण

Patil_p

इंडिया सिमेंटस्चा मध्यप्रदेशमध्ये कारखाना

Patil_p

78 टक्के ग्राहकांचे खर्चावर नियंत्रण

Patil_p

भारतासाठीच्या जीडीपी वृद्धीदराचा अंदाज फिचने घटविला

Patil_p

एलएमएलची सइरासोबत भागीदारी

Patil_p

मारुती सुझुकीची करुर वैश्य बँकेसोबत भागीदारी

Patil_p
error: Content is protected !!