तरुण भारत

कोल्हापूर : बिबटयाची तीन नखे, प्राण्याचे मांस जप्त

पाटगांव/ वार्ताहर

भुदरगड तालुक्यातील शिवडाव येथे वनविभागाच्या कारवाईत वसंत महादेव वास्कर याच्या घरी धाड टाकून बिबटय़ाची तीन नखे आणि संशयित प्राण्याचे मांस मिळून आल्याची घटना उघडकीस आली. वास्कर हे निवृत्त पोलीस पाटील आहेत.

याबाबत वन विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी शिवडाव येथील पुर्नवसन वसाहतमधील सिध्दानंदनगरमधील वसंत महादेव वास्कर ( वय ६२ ) याच्या घरात तीन बिबट्याची नखे व घरातील फ्रिजमध्ये साधारण ७२० ग्रॅम संशयीत प्राण्याचे मांस असल्याची गुप्त खबर कोल्हापूर येथील सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे व वन विभागाचे कर्मचारी यांना मिळाली. त्या अनुषंगाने सापळा रचून सकाळच्या सुमारास वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी वास्कर याच्या घरावर धाड टाकून त्याच्याकडून तीन बिबट्याची नखे आणि मांस आणि घरातील दुनाल १२ एम.एम.बंदुक असा मुदेमाल ताब्यात घेतला.

संशयित वास्कर याच्यावर भारतीय वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम१९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याचा आंतरराज्य टोळीत सहभाग आहे का? याचा वनअधिकारी शोध घेत आहेत. सदर गुन्ह्यतून बिबटय़ाची शिकार झाल्याचेही स्पष्ट होत असल्याने हे रॅकेट उघडकीस आणण्याचे आव्हान वनखात्यासमोर असून, ते हा तपास कसा तडीस नेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज झालेल्या कारवाईमध्ये वनसंरक्षक नवनाथ कांबळे याच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल युवराज पाटील, अशोक वाडे, किशोर आहेर, सुनिल खोत, वनपाल संदिप शिंदे, वनरक्षक जॉन्सन डिसोझा, सागर पटकारे, सागर यादव, पोलीस कॉन्स्टेबल प्रदिप भोसले, व वन कर्मचारी यांनी भाग घेतला.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बिबट्याची कातडी, नखे, दात, मांस, रक्त यांना मागणी असल्याने त्याची शिकार करून मागणी असलेल्या अवयवांची तस्करी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामूळे वन खात्याने याकडे लक्ष घालून पाटगांव परिसरात होणारी चोरटी शिकारीला आळा घालावा अशी मागणी पर्यटकप्रेमीकडून होत आहे.

वास्कर याचा मध पेठ्या लावण्याच्या निमित्ताने जंगलात वावर

वास्कर हे निवृत्त पोलीस पाटील असून त्यांचा मध मक्षिका पालनाचा व्यवसाय आहे या निमित्ताने वास्कर मध पेठ्या लावण्याच्या निमित्ताने जंगलात वावरत असतात. मागील आठवड्यातच कडगाव परिक्षेत्रातच गवा संशयास्पद मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत सापडला वन्य प्राण्यांच्या शिकारीचे वाढते प्रमाण याकडे वन विभाग मात्र दुर्लक्ष करत आहे ही चिंतेची बाब आहे.

Related Stories

लोकसभेचे 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

लातूरमध्ये 15 ते 30 जुलै दरम्यान कडक लॉक डाऊन

Rohan_P

भारतीय जन संविधान मंचाच्यावतीने 21 ऑक्टोबरला राष्ट्रीय परिषद

triratna

देशात ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन राशन’ योजना लागू करावी; , सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

triratna

नियमांचे पालन करीत महात्मा फुले जयंती साजरी

triratna

आगामी 4 ते 6 महिन्यात कोरोनाचा प्रकोप; परिस्थिती अधिक गंभीर होणार

Rohan_P
error: Content is protected !!