तरुण भारत

शिक्षकांच्या सन्मानार्थ होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

– शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र विभागातील माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता निधी संकलित केला आहे. निधीमधुन विभागातील चार निवृत्त शिक्षकांच्या नावे होतकरू विद्यार्थ्यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.शिष्यवृत्ती योजनेस या शैक्षणिक वर्षापासून औपचारिक प्रारंभ करण्यात येत असून दर वर्षी शिक्षक दिनी शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे.

शिवाजी विद्यापीठातील संख्याशास्त्र अधिविभागाची पायाभरणी करणाऱया प्रमुख शिक्षक- संख्याशास्त्रज्ञांमध्ये प्रा. एम.एस. प्रसाद, प्रा. आर.एन. रट्टीहळ्ळी, प्रा. एस.आर. कुलकर्णी आणि प्रा. बी.व्ही. धांद्रा यांचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1984 ते 1995 या कालावधीत एम.एस्सी. व पीएच.डी. संशोधन पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या प्राध्यापकांच्या योगदानाच्या कायमस्वरुपी सन्मानस्मृती जपण्याच्या भावनेतून त्यांच्या नावे चार विविध शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले.

त्यानुसार त्यांनी सुमारे पाच लाख रुपयांचा कृतज्ञता निधी उभारला. हा निधी विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आला असून त्या निधीच्या व्याजामधून अधिविभागात एम.एस्सी. प्रथम व द्वितिय वर्षात शिक्षण घेणाऱया प्रत्येकी दोन या प्रमाणे चार होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5000 रुपयांची शिष्यवृत्ती दरवर्षी शिक्षक दिनास प्रदान करण्याचे ठरविले.  संबंधित विद्यार्थ्यास किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अन्य कोणतीही रोख शिष्यवृत्ती वा फेलोशीप घेतलेली असू नये, एवढीच अट त्यासाठी आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी अधिविभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. अन्य दोन सदस्य हे अधिविभागातील शिक्षकांमधील असतील. ही माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. एच.व्ही. कुलकर्णी व माजी विद्यार्थी समिती समन्वयक डॉ. सोमनाथ पवार यांनी दिली.

या शिक्षकांच्या सन्मानार्थ शिष्यवृत्ती

  प्रा. एम.एस. प्रसाद, प्रा. आर.एन. रट्टीहळ्ळी, प्रा. एस.आर. कुलकर्णी आणि प्रा. बी.व्ही. धांद्रा या शिक्षकांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. 

स्वागतार्ह व अनुकरणीय पाऊल: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 नूतन विद्यापीठ कायद्यामध्ये त्याचप्रमाणे `नॅक’च्या मूल्यांकन निकषांमध्येही विभागाच्या, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे योगदान कशा प्रकारे प्राप्त होते, या बाबीला मोठे महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर संख्याशास्त्र अधिविभागाच्या सन 1984 ते 1995 या कालखंडात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उचललेले शिष्यवृत्तीचे हे पाऊल स्वागतार्ह आणि अनुकरणीय आहे. या माध्यमातून  शिक्षकांच्या प्रती आदरभाव जपला जाईल तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठबळ मिळेल. अन्य अधिविभागांनी, महाविद्यालयांनी अशा प्रकारे आपल्या माजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले आहे.

Related Stories

कोल्हापूर : पेठ वडगावात कोरोना रुग्णसंख्या १२५ वर

Abhijeet Shinde

गोव्याच्या साईभक्तावर काळाचा घाला, घुणकी येथे अपघाती मृत्यू

Abhijeet Shinde

रविकांत तुपकरांची ऑन दी स्पॉट मोहीम

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोना वॉर्डमध्ये दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

बाजारभोगाव ते पडसाळी रस्त्यासाठी साडेतीन कोटींचा निधी – खा. मंडलिक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनामुळे जिल्हा बँकेला दोन हजार कोटींचा फटका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!