तरुण भारत

बालकांसाठी सोशल मीडिया घातकच!

सध्याच्या काळात सोशल मीडियाची लोकप्रियता प्रचंड वाढल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत साऱयांना त्याचा नाद लागल्याची परिस्थिती आहे. सोशल मीडिया आता आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग झाला आहे, ही वस्तुस्थिती मान्य केली तरी लहान मुलांना त्याच्यापासून शक्मयतो दूर ठेवणेच हितकारक आहे, असे तज्ञांचे आग्रही प्रतिपादन आहे. लहान मुलांना सोशल मीडियाचा ऍक्सेस सहजगत्या उपलब्ध होत असतो. त्यावर काय पहावे आणि काय पाहू नये? याची जाणीव मात्र त्यांना नसते. हे भान निर्माण होईपर्यंत आई-वडिलांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि ते सोशल मीडियाचा उपयोग कशासाठी करतात? हे कसोशीने पाहणे आवश्यक आहे. बालवयात एका जागी बसून सोशल मीडियासारख्या साधनाचा नादिष्टपणे उपयोग करणे मुलांच्या प्रकृतीसाठीही अपायकारक आहे.

मुले सोशल मीडियावर काय पाहतात, हे आई-वडिलांना समजावे, अशी सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग मातापित्यांनी आणि घरातील इतर मोठय़ा लोकांनी आवर्जून केला पाहिजे. सोशल मीडियाच्या उपयोगावर पूर्णपणे बंदी आणणे योग्य नाही. मात्र, त्याचा उपयोग तारतम्य राखून करण्याचे प्रशिक्षण व प्रबोधन मुलांना देणे आवश्यक आहे. यासाठी आई-वडिलांनी मुलांना सोशल मीडियाच्या उपयोगाची समयसीमा निर्धारित करून द्यावी. फेसबुकसारख्या मीडियावर अकौंट असेल तर ते नियमितपणे पाहात जावे. सोशल मीडियातून योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही प्रकारच्या माहितीचा मारा होत असतो. लहान मुलांना त्यांच्या भवितव्याचा विचार करून याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचे लाभही अनेक आहेत. त्यातून सहजगत्या माहितीचे भांडार आपल्याला प्राप्त होते. लहान मुलांच्या होमवर्कमध्येही त्याचा उपयोग होऊ शकतो. घसबसल्या आपले शिक्षक आणि इतर मार्गदर्शक यांच्याशी संपर्क करता येतो. मुले आपल्या आवडीनुसार वेगवेगळे क्षेत्रांचे अत्याधुनिक ज्ञान मिळवू शकतात. तेव्हा सोशल मीडियाचा यथायोग्य उपयोग हा मुलांसाठी लाभदायक असतो, हे त्यांना पटवून देण्याची आणि अयोग्य बाबींपासून दूर ठेवण्याची आवश्यकता आहे.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्र : दिवसभरात 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांचे ‘ते’ पत्र व्हायरल

Abhijeet Shinde

सांगलीत राष्ट्रवादीचे जिल्हा शहर उपाध्यक्ष पाटोळे यांचा खून

Abhijeet Shinde

ऑनलाईन वर्ग सुरू झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द होणार

datta jadhav

पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 पैसे वाढ

Patil_p

रेल्वेचे खासगीकरण होणार नाही : पीयूष गोयल यांची घोषणा

Rohan_P
error: Content is protected !!