तरुण भारत

नव्या रुग्णांचा आकडा 45 हजारांवरच!

दिवसभरात 366 जणांचा मृत्यू ः 34 हजार 791 जणांना उपचाराअंती डिस्चार्ज

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारतात सध्या दररोज जवळपास 45 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या  आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 45 हजार 352 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. याचदरम्यान गेल्या 24 तासांत 366 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तर 34 हजार 791 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यापूर्वी एक दिवसाआधी देशात 47 हजार 092 दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच 509 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आतापर्यंत देशात 67 कोटी 9 लाख 59 हजार लसीचे डोस लसीकरण मोहिमेदरम्यान देण्यात आले आहेत.

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त रुग्णांहून अधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून आतापर्यंत चार लाखांसमीप पोहोचली आहे. यामध्ये भारत आता सातव्या स्थानी पोहोचला आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 29 लाख 3 हजार 289 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 39 हजार 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 3 कोटी 20 लाख 63 हजार 616 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 99 हजार 778 इतके सक्रिय रुग्ण अद्याप कोरोनाशी झुंज देत आहेत.

देशात लसीकरणाला वेग

देशात लसीकरणही वेगात सुरू असून 2 सप्टेंबरपर्यंत 67 कोटी 9 लाख 59 हजार लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच गेल्या 24 तासामध्ये 16 लाख 66 हजार 334 नमुने तपासण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या आठवडय़ापासून देशात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. सध्या दिवसभरात जवळपास 1 कोटीपर्यंत लाभार्थी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान

कोरोनाची दुसरी लाट कमी होत नाही तोच आता तिसऱया लाटेची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 30 हजारांच्या खाली गेलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा 40 हजारांच्या वर गेली आहे. देशात दररोज 40 हजारांहून अधिक रुग्ण सापडत असून सक्रिय रुग्णांचा आकडाही 4 लाखांच्या जवळ पोहोचला आहे. देशात रिकव्हर होणाऱया रुग्णांपेक्षा नवीन रुग्ण अधिक सापडत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढील आव्हान पुन्हा एकदा वाढले आहे.

Related Stories

उत्तराखंडात कोरोनाबाधितांची संख्या 52 हजाराच्या उंबरठ्यावर

Rohan_P

सीएए नियमांची एप्रिलमध्ये घोषणा शक्य

tarunbharat

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सर गंगाराम रुग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणाले – प्रकृती स्थिर

Rohan_P

शेतकरी, लघुउद्योजकांना आणखी दिलासा

Patil_p

‘काँग्रेस’च्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई

Amit Kulkarni

डान्स व्हिडिओंमुळे होतेय लाखोंची कमाई

Patil_p
error: Content is protected !!