तरुण भारत

प्राथमिक दूध संस्था नोंदणीचा धडाका

-गोकुळ निवडणुकीनंतर नव्याने दोनशे प्रस्ताव दाखल

विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर

Advertisements

जिल्ह्यात प्राथमिक दूध संस्थांच्या नोंदणीचा धडाका सुरु आहे. विशेष म्हणजे गोकुळच्या निवडणुकीनंतर मोठ्या संख्येने नवीन संस्थांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. आतापर्यंत तब्बल दोनशे संस्थांनी नोंदणीसाठी अर्ज दिले आहेत. प्राप्त अर्जांची सहायक निबंधक कार्यालयात पडताळणीची धांदल सुरु आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी राजकारण सेवा सोसायटी आणि दूध संस्थांच्या माध्यामातूनच चालते. ज्याच्या हातात या दोन संस्था त्याच्याच हातात गावाची सुत्रे असे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळते. नुकत्याच झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत दूध संस्थांच्या ठरावाला किती मोल आहे. हे जिल्हÎाने पाहिले आहे. प्रचंड इर्षा, टोकाचा संघर्ष आणि सुडाचे राजकारणही यानिमित्ताने जिल्हÎाने पाहिले. प्राथमिक दूध संस्था गोकुळच्या राजकारणात महत्वाचा घटक आहे. यासाठीच मोठया प्रमाणात संस्था नोंदणी केल्या जात आहेत. भविष्यातील गोकुळची निवडणूकही यासाठी कारणीभूत असू शकते.

डेडलाईन 2023

नुकत्याच पार पडलेल्या गोकुळच्या निवडणुकीत शंभर ते चारशे मताच्या फरकाने शेतकरी आघाडीचे उमेदवार विजयी झाले. अतितटीच्या लढतीत महाडिक-पी. एन. पाटील गटाचेही चार संचालक विजयी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात गोकुळवर शंभर टक्के सत्ता आली पाहिजे हे ध्येय ठेऊन आतापासूनच नियोजन सुरु आहे. गोकुळची पुढील निवडणूक 2025 ला होऊ शकते. संघाच्या पोटनियमानुसार निवडणूक तारखेपूर्वी तीन वर्षे संस्था सभासद असली पाहिजे. त्यामुळे 2021 मध्ये जास्तीजास्त संस्था कशा नोंदणी होतील याकडे कल आहे.

करवीर, कागल, राधानगरीतून नोंदणीसाठी कल

गोकुळ निवडणुकीत हातकणंगले, करवीर, कागल, पन्हाळा तालुक्यातून विरोधी आघाडीचे संचालक विजयी झाले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील संस्था अधिक नोंदण कशा होतील याकडे भर दिला आहे. यातूनच विशेषत: करवीर, कागल, राधानगरी, पन्हाळा या तालुक्यातून सर्वाधिक प्रस्ताव दाखल झाले आहेत.

मागील 250 संस्थांचे काय होणार?

निवडणुकीच्या पार्श्वभूमवर मागील संचालक मंडळाने जवळपास 250 दूध संस्था नोंदणी केल्या होत्या. मात्र उपविधीतील तरतुदीमुळे या संस्थांचे ठराव मतदानासाठी पात्र ठरले नव्हते. याचाच फटका महाडिक- पी. एन. पाटील आघाडीला बसला. आगामी निवडणुकीत या संस्था मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे हे मतदार निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संस्थांही सत्ताधारी गटाच्या रडारवर येऊ शकतात. त्यामुळे या संस्थांना चाळण लागण्याची शक्यता आहे. कदाचित कायद्याच्या कसोटीवर या संस्था टिकल्या तरी ही भरपाई करण्यासाठी नविन संस्थांची नोंदणी हा एक भाग असू शकतो.

17 संस्था पुनर्रजीवीत

31 मार्च 2021 या आर्थिक वर्षात 215 संस्थांची वाढ झाली आहे. तर दूध नसने, व्यवहार बंद, आदी कारनाने अवसायनान काढलेल्या 17 संस्था पुनर्रजीवीत केल्या आहेत. अशा 232 संस्था वाढलेल्या आहेत. आता या दोन महिन्यात नोंदणीसाठी आलेल्या 200 प्रस्तावांची भर पडणार आहे.

तालुकानिहान सध्याची स्थिती

तालुका             संस्था

गडहिंग्लज                335

आजरा             313

भुदरगड             498

चंदगड             433

शाहूवाडी                  388

राधानगरी                 580

पन्हाळा             546

गगनबावडा                130

करवीर             781

हातकणंगले                274

शिरोळ             248

कागल             469

एकुण              4995

Related Stories

धनंजय महाडिकांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; सतेज पाटील यांच्यावरील टीकेला देशमुखांचे प्रत्युत्तर

triratna

कुरुंदवाड शहरात 70 हून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई, 27 हजाराचा दंड वसूल

triratna

उच्च वीज दाबाने वाकरेत घरगुती साहीत्य जळाले, चार लाखांचे नुकसान

triratna

कोल्हापूर शहरात कोरोनाने एकाचा मृत्यू, 33 नवे रूग्ण

triratna

पुढील आठवडयानंतर आंबा दर कमी होणार

triratna

कोल्हापूर : गांधीनगरमधून अकरा वर्षीय मुलाचे अपहरण

triratna
error: Content is protected !!