तरुण भारत

तालिबान सरकारची आज घोषणा; मुल्ला बरादर करणार नेतृत्व

ऑनलाइन टीम / काबुल :

अफगाणिस्तानात तालिबान सरकारची घोषणा आज केली जाईल. तालिबानचे सहसंस्थापक मुल्ला बरादर या सरकारचे नेतृत्व करतील. हे सरकार शुक्रवारी स्थापन होणार होते. मात्र, ते एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आले. तालिबानचे प्रवक्ते झाबीउल्ला मुजाहिद यांनी स्थानिक मीडियाला याबाबतची माहिती दिली आहे.

Advertisements

मुजाहिद म्हणाले, दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे अध्यक्ष मुल्ला अब्दुल गनी बरादर यांना सरकारप्रमुख बनवण्याची जाहीर घोषणा लवकरच केली जाईल. मुल्ला बरादर यांच्यासह मुल्ला मोहम्मद जेकब आणि शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजई, तालिबानचे संस्थापक मुल्ला ओमर यांचे पुत्र, देखील या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.

तालिबान माहिती आणि संस्कृती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी मुफ्ती इनामुल्ला समांगनी म्हणाले की, सर्व प्रमुख नेते काबूलमध्ये पोहोचले आहेत आणि नवीन सरकारची घोषणा करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सरकारच्या स्थापनेबाबत एकमत झाले असून, आता मंत्रिमंडळावर काही आवश्यक चर्चा होत आहे.

Related Stories

ब्रिटनमध्ये सप्टेंबरमध्ये वेगवान लसीकरणावर प्रशासन देणार भर

Patil_p

ब्रिटननिर्मित लसीची लवकरच घोषणा शक्मय

Patil_p

‘या’ देशात मुलांची फॅक्ट्री

Patil_p

मेक्सिकोमध्ये 5,714 नवे कोरोना रुग्ण; 579 मृत्यू

Rohan_P

पेगॅसस तयार करणाऱया कंपनीवर अमेरिकेचा चाप

Amit Kulkarni

चिनी अंतराळवीरांनी केली अंतराळाची सैर

Patil_p
error: Content is protected !!