तरुण भारत

‘आप’च्या ‘भगवंत’ मान यांचे शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू – सोशल मीडियाद्वारे दाखवित आहेत बळ

वृत्तसंस्था / संगरूर

Advertisements

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर केलेला नाही. तर याचदरम्यान नाराजीमुळे पक्षाच्या कार्यक्रमांपासून अंतर राखणारे पंजाबमधील खासदार भगवंत मान सक्रीय झाले आहेत. मान यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार घोषित होण्यापूर्वी पक्षावरील दबाव वाढविण्यास प्रारंभ केला आहे. याकरता मान घरीच ‘शक्तिप्रदर्शन’ करत आहेत. पक्षापर्यंत संदेश पोहोचविण्यासाठी भगवंत मान सोशल मीडियाद्वारे कार्यकर्त्यांचे पाठबळ दर्शवित आहेत.

खासदार भगवंत मान यांच्या संगरूर येथील निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भगवंत मान यांचे नाव जाहीर व्हावे अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. मुख्यमंत्रिपदाचा दावेदार घोषित न केल्यास पक्षाला नुकसान होईल असा दावा करण्यात येत आहे. याचदरम्यान आमदार कुलतार संधवा यांनी उघडपणे मान यांना समर्थन दर्शविले आहे.

पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर

आम आदमी पक्षाच्या कार्यक्रमांपासून खासदार भगवंत यांनी राखलेला दुरावा कायम आहे. मान यांचा दावा किती मजबूत आहे हे पाहण्यासाठी पक्षाने त्यांना वातावरण निर्मिती करण्याची संधी दिली असल्याचीही चर्चा आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा दावेदार घोषित करण्यात विलंब होत असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पक्षाने उत्तराखंडसाठी अजय कोठियाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून सादर केले आहे. पण पंजाबमध्ये असा दावेदार जाहीर करणे पक्षाने टाळले आहे. 2017 च्या निवडणुकीतही विरोधकांनी पंजाबमध्ये आम आदमी पक्ष जिंकल्यास राज्याबाहेरील नेता मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला होता, यामुळे पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागले होते.

Related Stories

पंजाबमधील कोरोना : सध्या 5,641 रुग्णांवर उपचार सुरु

Rohan_P

एक महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या वैमानिकाचा मृत्यू, 200 क्रू मेंबर्सचे विलगीकरण

Rohan_P

बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा धक्कादायक पराभव

triratna

प.बंगाल राज्यपालांकडून राज्य सरकारची खरडपट्टी

Patil_p

रिव्हर्स रेपो आणि रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही : शक्तिकांत दास

Rohan_P

धावत्या शताब्दी एक्स्प्रेसला आग ; सुदैवाने प्रवासी सुखरूप

triratna
error: Content is protected !!