तरुण भारत

ऑस्ट्रेलियात कोरोना रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ

सिडनी

ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटात सापडला आहे. अलीकडच्या काळात डेल्टा व्हेरीयंटचे न्यू साऊथ वेल्समध्ये 1 हजार 756 कोरोना रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याशिवाय चार जणांचा कोरोनाने मृत्यु झाल्याची माहिती पुढे आली आहे. जूनच्या मध्यापासून डेल्टा व्हेरीयंटचा प्रभाव ऑस्ट्रेलियात वाढत असताना दिसला आहे. शनिवारी एकाच दिवशी सर्वाधिक 1700 हून अधिक कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. धोका वाढत असल्याचा इशारा प्रशासनाने दिला असून लोकांनी लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्हिक्टोरियात 190 रुग्ण, राजधानीत 32 आणि क्वीन्सलँडमध्ये 1 रुग्ण कोरोनाचा आढळून आलाय.

Advertisements

Related Stories

मुंबईतील ‘ब्लॅकआऊट’मागे चीन

Patil_p

चीनमध्ये सापडले ब्यूबॉनिक प्लेगचे रुग्ण

Patil_p

ट्रम्प अन् बिडेन यांच्यात पहिला अध्यक्षीय वादविवाद

Patil_p

किर्गिस्तानला 20 कोटी डॉलर्सची मदत

Patil_p

माणुसकी व्यक्त करणारे छायाचित्र

Patil_p

2 कोटी बंदुकांची विक्री

Patil_p
error: Content is protected !!