तरुण भारत

मोटररेसिंग चालक रायकोनेनला कोरोनाची बाधा

वृत्तसंस्था/ ऍमस्टरडॅम

एफ-1 मोटररेसिंग अल्फा रोमिओ संघाचा अव्वल चालक किमी रायकोनेनला कोरोनाची बाधा झाल्याने तो आगामी होणाऱया हॉलंड ग्रा. प्रि. एफ-1 मोटररेसिंग शर्यतीमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

Advertisements

एफ-1 ग्रा. प्रि. हॉलंड मोटर शर्यत चालू आठवडाअखेरीस होत आहे. अल्फा रोमिओ संघातील चालक किमी रायकोनेन याची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला काही दिवसांसाठी विलगीकरणामध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हॉलंड ग्रा. प्रि. शर्यतीसाठी अल्फा रोमिओ संघामध्ये रायकोनेनच्या जागी रॉबर्ट कुबिकाचा समावेश करण्यात येणार आहे.

कुबिकाने 2019 साली अबुधाबीतील ग्रा. प्रि. मोटर शर्यतीमध्ये आपला शेवटचा सहभाग दर्शविला होता. 41 वषीय रायकोनेनला हॉटेलमधील एका रुममध्ये विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे. काही दिवसानंतर पुन्हा रायकोनेनची कोरोना चाचणी घेतली जाईल. या चाचणीत तो निगेटिव्ह आढळल्यास त्याला एफ-1 क्षेत्रातील पुढील शर्यतीमध्ये सहभागी होता येईल. दरम्यान, पुढील आठवडय़ात होणाऱया इटालियन ग्रा. प्रि. मोटर शर्यतीमध्ये तो कदाचित सहभागी होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.

Related Stories

रशियन ग्रां प्रिमध्ये मर्सिडीजचा बोटास विजेता

Patil_p

अर्लीन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

Patil_p

दुचाकी अपघातात वॉर्नला दुखापत

Patil_p

सराव सामन्यात पुनरागमन करण्याचा मार्शचा विचार

Omkar B

चेन्नाई सुपरस्टार उपांत्य फेरीत

Patil_p

कौंटी सिलेक्ट संघाचे नेतृत्व ऱहोड्सकडे

Patil_p
error: Content is protected !!