तरुण भारत

जलसमाधी परिक्रमा यात्रा: नृसिंहवाडीला पोलीस छावणीचे स्वरूप

कुरुंदवाड/ प्रतिनिधी

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेले पंचगंगा परिक्रमा जलसमाधी पदयात्रा रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे येणार असून या पार्श्‍वभूमीवर येथे पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिर मार्गावर येणारे सर्व राम शिंदे बंद करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी सकाळी येथील बस स्थानक येथे डीवायएसपी बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस परेड घेण्यात आली. यानंतर सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान सायंकाळी होणारे जलसमाधी आंदोलनाला पूर्वी येथील बस स्थानकावर जाहीर सभा होणार आहे. पण या ठिकाणी आंदोलन चे प्रमुख राजू शेट्टी यांना स्थानबद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २० पोलीस अधिकारी पाच पोलीस निरीक्षक, ३५० पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर येथील कुरुंदवाड घाट रस्त्यावर ब्रॅकेट लावून तेथील रस्ता बंद करण्यात आला आहे. स्वागत कमान तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, मुख्य मंदिर मार्ग बंद करण्यात आला आहे. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : किल्ल्यांवर पहारा देण्यासाठी मावळे सज्ज

Abhijeet Shinde

कोल्हापूर : भादोलेत सापडला नऊ फुटी अजगर

Abhijeet Shinde

गडमुडशिंगी येथील घरफोडी उघडकीस, पाच जणांना केली अटक

Abhijeet Shinde

सांगली : एसटीच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

Abhijeet Shinde

दिल्लीत सध्या लॉकडाऊनची गरज नाही; पण… : सत्येंद्र जैन

Rohan_P

दीड महिन्यानंतर कोविशिल्ड बुस्टर अधिक परिणामकारक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!