तरुण भारत

नागपूरच्या कन्हान नदीत बुडून ५ जणांचा मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या यवतमाळमधील ५ युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील गाडेघाट येथे १३ युवक दर्शनासाठी आले होते. यापैकी पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. कन्हान पोलिसांनी घटनास्थळीधाव घेत युवकांचा शोध घेणे सुरू केले आहे. मात्र, पोलिसांना अद्याप एकही मृतदेह सापडलेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अरबाज ऊर्फ लकी (वय २२), अयाज बेग हफीज बेग (वय २०), मो. अनुअर मो. अल्फाज (वय १८), मो. सप्तहीन मो. इकबाल शेख (वय २१) व ख्वाजा बेग तबुस्सर बेग (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. कन्हानपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घाडेघाट येथील अम्माचा दर्गा धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी ते दर्शनासाठी आले होते. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Advertisements

Related Stories

रब्बीमध्ये सुरळीत वीजपुरवठा करा : डॉ. नितीन राऊत

Rohan_P

JEE, NEET परीक्षा वेळेतच होणार : सुप्रीम कोर्ट

datta jadhav

कोरोनाला हरवण्याचा जिल्हावासियांचा निर्धार

Patil_p

ममता बॅनर्जी आज PM मोदींची भेट घेणार; ‘या’ मुद्यांवर होणार चर्चा

datta jadhav

दरोड्यातील आरोपीस कवठेमहांकाळ मध्ये अटक

Abhijeet Shinde

नीरव मोदीचे होणार भारताकडे प्रत्यार्पण

Amit Kulkarni
error: Content is protected !!