तरुण भारत

नृसिंहवाडी जलसमाधी पदयात्रेत सुमारे 3000 पूरग्रस्त शेतकरी सहभागी

कुरुंदवाड / रवींद्र केसरकर

प्रयाग चिखली येथून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या साठी सुरू झालेली शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांची पंचांग परिक्रमा समाधी पदयात्रा रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत कुर्डूवाडी येथे दाखल होणार असून येथील पालिका चौकात छोटी कॉर्नर सभा होणार आहे. यानंतर ही पदयात्रा शहरातील मुख्य मार्गावरून नृसिंहवाडी कडे मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा संगम नदीपात्रात या आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी 10 यांत्रिक बोटी रेस्क्यू फॉर्स चे जवान तसेच येथील दिनकर यादव फुलावर कडक पोलीस बंदोबस्तत्याचबरोबर कुरुंदवाड घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या परिक्रमा जलसमाधी पदयात्रेत 3000 च्या आसपास पूरग्रस्त शेतकरी सहभागी झाले आहेत.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील बस स्थानकावर पदयात्रा आल्यानंतर या पदयात्रेचे सभेत रूपांतर होणार आहे. सायंकाळी 5 नंतर ही सभा सुरू होईल. असा अंदाज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ही सभा संपल्यानंतर जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान पोलीस प्रशासन आंदोलन करते राजू शेट्टी यांना स्थानबद्ध करण्याची शक्यता आहे.

कृष्णा पंचगंगा नदी पात्र संगम घाटावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तसेच यांत्रिक बोटी विविध रेस्क्यू फॉर्स शेकडो जवान तैनात करण्यात आले आहेत. याचबरोबर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे विविध पॉईंटवर 400 पोलीस तसेच पोलीस प्रशासनाकडून राज्य राखीव पोलीस दलाची 350 जवानांची कुमक मागवण्यात आली आहे. हे जवान बस स्थानक परिसरात तैनात आहेत. पंचगंगा परिक्रमा जलसमाधी पदयात्रेत महिलांच्या कडून औक्षण करण्यात येत आहे. त्याचबरोबर कार्यकर्ते ढोल ताशा लेझीम फटाके व फुलांची उधळण करत आहेत. एकूणच या पदयात्रेचा पोलीस यंत्रणेवर मोठा ताण दिसत आहे.

Advertisements

Related Stories

‘कोरोना’ची धास्ती ठरतेय.. औषधोपचारात अडसर..!

Abhijeet Shinde

कोरोनाः कर्नाटकात बुधवारी ८,६४२ बाधित

Abhijeet Shinde

दैव बलवत्तर म्हणूनच ट्रॅक्टर थांबला अन्यथा …

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत नवे रूग्ण दुप्पट, 2375 नवे रुग्ण, 20 मृत्यू

Abhijeet Shinde

तरुणीची छेड काढल्याच्या समजूतीतून तरुणावर प्राणघातक हल्ला

Abhijeet Shinde

सांगली : ‘पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करा’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!