तरुण भारत

राजू शेट्टींच्या जलसमाधी यात्रेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

प्रतिनिधी / शिरोळ

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांची पंचांग परिक्रमा समाधी पदयात्रा प्रयाग चिखली येथून सुरु झाली. आज सकाळपासून नृसिंहवाडीच्या दिशेने ही पदयात्रा सुरु आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील बस स्थानकावर पदयात्रा आल्यानंतर या पदयात्रेचे सभेत रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही सभा संपल्यानंतर राजू शेट्टी जलसमाधी आंदोलन करणार आहेत. मात्र याआधीच या जलसमाधी यात्रेचे दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतली आहे. तर, उद्या सोमवारी दुपारी तीन वाजता वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.

तर, या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. कृष्णा पंचगंगा नदी पात्र संगम घाटावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तसेच यांत्रिक बोटी विविधरेस्क्यू फॉर्स शेकडो जवान तैनात करण्यात आले आहेत. याचबरोबर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे विविध पॉईंटवर 400 पोलीस तसेच पोलीस प्रशासनाकडून राज्य राखीव पोलीस दलाची 350 जवानांची कुमक मागवण्यात आली आहे.

Advertisements

Related Stories

सांगली जिल्ह्याला दिलासा नाहीच : १९ जुलैपर्यंत निर्बंध कायम

Abhijeet Shinde

राजस्थान : कोरोना बाधिताची एकूण संख्या 5 हजार 629 वर

Omkar B

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, पुढील 4 दिवस अतिवृष्टीचे; हवामान खात्याचा इशारा

Rohan_P

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू, 15 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

दिल्ली : आयजीआय विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी

datta jadhav

क्रांतिज्योती सावित्रीची लेक पुरस्काराचे वितरण

Sumit Tambekar
error: Content is protected !!