तरुण भारत

कृषी कायद्यांविरोधात २७ सप्टेंबरला भारत बंद, राकेश टिकैतांची घोषणा

मुझफ्फनगर / प्रतिनिधी

मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्राने लागून केलेले कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. या मुद्द्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, या चर्चांतून कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाने जोर पकडला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून कृषी कायदे तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली. टिकैत यांच्या या घोषणेनंतर आता केंद्र सरकारच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेस टिकैत उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मेळावे भरवत आहेत. महापंचायतीच्या त्यांनी येत्या २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. याआधी किसान मोर्चाने २५ सप्टेंबर रोजी भारत बंद करण्यात येईल असे सांगितले होते.

केंद्राने लागून केलेल्या कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. या मुद्द्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, या चर्चांतून कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाने जोर पकडला आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेस टिकैत उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मेळावे भरवत आहेत. तसेच या महापंचायतीमध्ये राकेश टिकैत केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असून २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा राकेश टिकैत यांनी केली आहे.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्या उद्या बंद राहणार

datta jadhav

नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनेलच्या प्रसारणावर बंदी

datta jadhav

दोन पाटलांनी घेतली अमित शहा यांची भेट

Abhijeet Shinde

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या कालावधीत वाढ

Patil_p

आयआरसीटीसीची नवी वेबसाईट, मिनिटाला 10 हजार तिकिटांचे बुकिंग शक्य

Rohan_P

अँटिग्वा-बारबुडामध्ये पोहोचला मेहुल चोक्सी

Amit Kulkarni
error: Content is protected !!