तरुण भारत

तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा

ममता बॅनर्जी भवानीपूरमधून लढणार

कोलकाता / वृत्तसंस्था

Advertisements

पश्चिम बंगालमधील तीन जागांवर होणाऱया विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने रविवारी उमेदवारांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर अमिरूल इस्लाम यांना समसेरगंज आणि झाकीर हुसेन यांना जंगीपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या तीन जागांसाठी 30 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार असून मतमोजणी 3 ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे.

पश्चिम बंगालमधील समसेरगंज आणि जंगीपूर जागा आमदारांच्या मृत्यूनंतर रिक्त झाल्या, तर भवानीपूरचे तृणमूलचे आमदार सोवनदेब चट्टोपाध्याय यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी राजीनामा देत जागा रिक्त केली होती. बंगाल निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला. त्यानंतर टीएमसीच्या विधिमंडळ पक्षाने ममतांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती. साहजिकच आता शपथ घेतल्यापासून 6 महिने पूर्ण होण्यापूर्वी त्यांना आमदार म्हणून निवडून येणे क्रमप्राप्त आहे.

Related Stories

उपचारास नकार देणाऱया खासगी रुग्णालयांवर कारवाई करणार

Rohan_P

देशात 32,080 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

दिल्लीत गेल्या 24 तासात 1227 नवे कोरोना रुग्ण; 29 मृत्यू

Rohan_P

राम मंदीर न्यासाकडून भूमी व्यवहारांचे स्पष्टीकरण

Patil_p

मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती, तर चांगलं झालं असतं? : पंतप्रधान मोदी

Abhijeet Shinde

धावत्या बसमध्ये 80 फुटांची गॅस पाईप घुसली आरपार; 2 ठार, 12 जखमी

datta jadhav
error: Content is protected !!