तरुण भारत

साताऱयात ट्रक कोसळून लाखो रुपयांचे नुकसान

अंजठा चौक परिसरातील घटना -सुदैवाने जीवीतहानी नाही

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

साताऱयातून जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावर अंजठा चौकात रविवारी सकाळी कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक उड्डाण पुलावरुन कठडा तोडून सुमारे 50 ते 60 फूट खाली सर्व्हिस रस्त्यावर खाली कोसळला. यामध्ये ट्रकसह आतील मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी, रविवारी सकाळी कर्नाटक राज्यातील ट्रक क्रमांक के. ए. 51 ए. बी. 4470 हा कपडे व बॅरलच्या मालाने भरलेला ट्रक घेवून चालक निघाला होता. साताऱयातील अंजठा चौक परिसरातील उड्डाणपुलावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक मागे मागे येवू लागला. तो येत असून कठडा तोडून सुमारे 50 ते 60 फूट खाली कोसळला.

ट्रक खाली पडल्यानंतर मोठा आवाज झाला. मात्र, सकाळची वेळ असल्याने वाहनांची व नागरिकांची वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातात ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून चालकाचे नाव समजू शकले नाही. चालक किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून अपघाताचा पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत याबाबत नोंद झालेली नव्हती.

Related Stories

सांगली : जन्मदात्या बापानेच केला मुलाचा खून

Abhijeet Shinde

अडीच महिन्यानंतर बार्शी शहरात कोरोनाचा शिरकाव

Abhijeet Shinde

निराधार महिलांचा आधारवड वैशाली विरकर

datta jadhav

हा टाईमपास कशाला?, निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका

Abhijeet Shinde

एकटय़ाच वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱयाने लावली शिस्त

Patil_p

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 8 कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!