तरुण भारत

चाकूच्या धाकाने कारचालकाची लूट

केएलई इस्पितळासमोरील घटना

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

इलकलहून रुग्ण घेऊन बेळगावला आलेल्या एका कारचालकाला चाकूच्या धाकाने लुटण्यात आले आहे. रविवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास केएलईएस संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळासमोर ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी इलकल येथील एका रुग्णाला उपचारासाठी येथील केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा कारचालक नेहमी कारमध्येच झोपतो. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री इस्पितळ आवारातील गणेश मंदिरासमोरील प्रवेशद्वाराजवळ कार उभी करून तो झोपला होता.

पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास कारजवळ आलेल्या चौघा जणांनी कारच्या खिडकीवर टप्टप् केली. त्यामुळे चालकाला जाग आली. त्याने खिडकीची काच खाली केली. इस्पितळात आमचाही रुग्ण दाखल आहे. त्याची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल हवा आहे. आमच्याकडील मोबाईलचे चार्जिंग संपले आहे, असे सांगितले. त्यामुळे कारचालकाला त्यांची दया आली. त्याने आपला मोबाईल त्यांना दिला.

मोबाईल मिळताच चौकडीतील एकाने चाकू बाहेर काढला व दमदाटी करून कारचालकाच्या खिशातील पाकिट काढून घेण्यात आले. या पाकिटात 4 हजार रुपये रोकड होती. कारमधील कपडय़ांची बॅगही चौकडीने लांबविली आहे. मोबाईल, पाकिट व कपडय़ांची बॅग घेऊन चौकडी तेथून निघून गेली. यासंबंधी पोलिसात फिर्याद दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले.

बेळगाव शहर व उपनगरात चोऱया, घरफोडय़ांचे प्रकार वाढले आहेत. पोलीस यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाली असून आता चाकूचे धाक दाखवत परगावाहून आलेल्या नागरिकांना लुटण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. निष्क्रिय पोलीस यंत्रणेमुळे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत.

गणेशोत्सवाच्या तोंडावर…

गणेशोत्सवाच्या तोंडावर गुन्हेगारीच्या घटना वाढीस लागल्या असून सणासाठी रात्री-अपरात्री परगावाहून आपल्या घरी परतणाऱया प्रवाशांना अशा लुटारुंचा फटका बसण्याची शक्मयता लक्षात घेऊन पोलीस खात्याने त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

स्थलांतरित भाजी मार्केटमध्ये वर्दळ वाढली

Amit Kulkarni

खडा पहारा उपक्रमासाठी वडगावमध्ये जागृती

Amit Kulkarni

चर्चमध्ये का घुसला तलवारधारी?

Patil_p

जमखंडीत उद्यापासून दुपारनंतर सर्व व्यवहार बंद

Patil_p

‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह झिजविती चंदनापरी!’

Amit Kulkarni

मध्य रेल्वेच्या पॅसेंजर, धावताहेत कर्नाटकात

Patil_p
error: Content is protected !!