तरुण भारत

‘ही’ आहेत कोरोनाची नवी लक्षणे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असतानाच कोरोनाची नवी लक्षणे समोर आली आहेत. कोरोना आपले रूप बदलत असून त्याचा नवीन म्युटेंट तयार होत असल्याची माहिती कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे.

Advertisements

डॉ. पंडित म्हणाले, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांना ताप, घसा खवखवणे, श्वास घेण्यात अडचण निर्माण होणे, डोकेदुखी यासारख्या समस्या जाणवत होत्या. मात्र, आता कोरोनाची नवी लक्षणे समोर आली आहेत. त्यामध्ये तोंड सुकणे, तोंडात लाळ तयार होणे, दीर्घकाळ डोकेदुखी, कमी ऐकू येणे, डोळे येणे यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. या नव्या लक्षणांमुळे लोकांची चिंता वाढली असून, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीतही याबाबतची माहिती देण्यात आल्याचे पंडित यांनी सांगितले.

Related Stories

शिक्षण आयुक्त रमेश चव्हाण यांचा गौरव

Patil_p

अर्थमंत्री अजित पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

prashant_c

देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणारा अटकेत

Rohan_P

हुपरीत 9 डॉक्टरांसह कोरोना रुग्णांची संख्या 207 वर

Abhijeet Shinde

कुंभोज: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १६ जणांचा अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम, 20 दिवसांनी आले जगासमोर

datta jadhav
error: Content is protected !!