तरुण भारत

पैज पूर्ण करण्यासाठी धावले 400 किलोमीटर

मद्याच्या नशेत 3 मित्रांनी लावली पैज

मद्याच्या नशेत तीन मित्रांनी बोलता-बोलता अजब पैज लावली. ही पैज पूर्ण करणे तिघांनीही चांगलेच मनावर घेतले होते. अशा स्थितीत ही पैज पूर्ण करण्यासाठी तिघांनीही शरीर होरपळून काढणाऱया उष्णतेत केलेले कृत्य अत्यंत हैराण करणारे होते.

Advertisements

जॉडी ब्रॅग, गॉल्ड आणि गेबे या मित्रांनी एक दिवस मद्याची पार्टी केली होती. या पार्टीदरम्यान त्यांनी विचित्र पैज लावली, ही पूर्ण करण्यासाठी तिघेही दुर्गम पर्वतीय क्षेत्रांमध्ये सुमारे 400 किलोमीटर धावले असून याकरता त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

इतकी लांब शर्यत पायी पूर्ण करणारे जगातील आपण पहिले व्यक्ती असू असे या तिन्ही मित्रांचे मानणे आहे. या लोकांनी 400 किलोमीटरची शर्यत अत्यंत तीव्र उष्णता असताना पूर्ण केली आहे.

जॉडी आणि गेबे यांनी मद्य प्राशन केल्यावर फिरत्या ग्लोबवर जेथे बोट ठेवू तेथपर्यंत धावत जाण्याची पैज लावली होती. या पैजेमुळे त्यांना ताजिकिस्तानमध्ये जावे लागले. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या चीन आणि तजाकिस्तानच्या बारटांग खोऱयापर्यंत ते धावले. विशेष बाब म्हणजे या क्षेत्राला जगातील सर्वात दुर्गम आणि निर्जन क्षेत्रांपैकी एक मानले जाते आणि हे पामीर पर्वतरांगेदरम्यान आहे.

मी एक चांगला धावपटू आहे, पण याहून अधिक मद्य पिण्यात मी चांगला आहे. मद्याच्या नशेत लावलेली पैज पूर्ण करण्याचा मी ध्यास घेतला होता. ताजिकिस्तानविषयी मला काहीच माहिती नव्हते असे जोडीने सांगितले.

दौड सुरू करताना आमच्याकडे एक नकाशा होता आणि मार्गाबद्दल काहीशी माहिती होती. तेथे (वाटेत) दिवस उष्ण आणि रात्र थंडी असेल असे वाटले होते. प्रवास खूपच मोठा होता, पण अत्यंत रोमांचक होता. या प्रवासात तिन्ही मित्रांनी आजार, जखम, नैसर्गिक अडथळे, उष्णता तसेच व्हिसासह अनेक अडचणींना सामना केला. यादरम्यान आम्ही ‘जगाचे छत’ (पामीरचे पठार) ओलांडल्याचे जॉडीने सांगितले.

तिघांनीही या लांब दौडीला डॉक्यूमेंटेड केले आहे. तिन्ही मित्र प्रतिदिन एका मॅराथॉनपेक्षाही अधिक धावल्याचा दावा करण्यात आला. तिन्ही मित्र स्वतःच्या अभूतपूर्व कामगिरीमुळे चर्चेत आहेत.

Related Stories

अमेरिकेच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार

Patil_p

अफगाणिस्तानात सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधीशांची हत्या

datta jadhav

ज्यो बिडेन यांनी ड्रग टेस्ट करवून घ्यावी!

Patil_p

इस्रायलमध्ये योगदिन उत्साहात साजरा

Amit Kulkarni

‘हेपॅटायटिस-सी’ विषाणूच्या शोधासाठी ‘नोबेल’

Patil_p

पाकिस्तान हिंसाचाराच्या विळख्यात

Patil_p
error: Content is protected !!