तरुण भारत

मारूतीसह इतर कंपन्यांकडून उत्पादनात होणार घट

वृत्तसंस्था/ कोलकाता

मारुती सुझुकीने आपल्या उत्पादनामध्ये 60 टक्क्मयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. सदरचा निर्णय हा कंपनीला सेमिकंडक्टरच्या अनियमीत पुरवठय़ामुळे घ्यावा लागतो आहे.

Advertisements

त्यामुळे भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी चालू सप्टेंबर महिन्यातच आपल्या कार उत्पादनामध्ये 60 टक्केपर्यंत कपात करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कार निर्मितीसाठी सध्याला कंपनीला लागणाऱया सेमीकंडक्टर आणि चीपच्या अपुऱया पुरवठय़ामुळे उत्पादनावर परिणाम होतो आहे. त्यामुळे कंपनीच्या हरियाणातील कारखान्यांमध्ये व कंत्राटी निर्मिती कंपन्यांकडूनही कारच्या निर्मितीमध्ये कपात केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्याला कंपनी कारखान्यांमधून जवळपास 40 टक्के उत्पादन घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. जुलैमध्ये कंपनीने 1 लाख 70 हजार 719 मोटारींचे उत्पादन घेतले होते. ऑगस्टमध्ये उत्पादन जुलैच्या तुलनेमध्ये कमी राहणार असल्याचेही संकेत कंपनीने व्यक्त केले आहेत. वफंनीने गुजरातमधील कारखाना ऑगस्टमध्ये काही दिवस बंद ठेवला होता. तिकडे महिंद्रा आणि महिंद्रा, रेनॉ-निस्सान, फोर्ड, एमजी याही कंपन्या आपल्या मोटार उत्पादनात कपात करणार आहेत.

सप्टेंबरच्या महसुलावर होणार परिणाम

दरम्यान उत्पादनात घट करण्यात आल्याने याचा परिणाम कंपनीच्या महसुलावर होणार आहे. ऐन उत्सवाच्या तोंडावरच चिपच्या टंचाईचा सामना कंपन्यांना करावा लागतो आहे.

Related Stories

टॅक्सी सेवा क्षेत्रातील उबरच्या उत्पन्नात वाढ

Patil_p

भारताच्या निर्यातीत 45 टक्के वाढ

Patil_p

अंबानी पुन्हा आशियात श्रीमतांमध्ये सर्वोच्च

Patil_p

‘जिओ’चा 7 वा करार; ADIA ने केली 5,683 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

ब्रुकफिल्डकडून 30 एकरची जागा खरेदी

Patil_p

सिम्पल एनर्जीचा इलेक्ट्रिक दुचाकीचा मोठा कारखाना

Patil_p
error: Content is protected !!