तरुण भारत

बसपास वितरणाला प्रारंभ; लाभ घेण्याचे आवाहन

जुन्या बसपासची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत  

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

मध्यवर्ती बसस्थानकाच्या बसपास विभागात बसपास वितरणाला प्रारंभ झाला. 1 सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना पास वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक लाठी यांनी दिली. मागील वर्षापासून बसपासची प्रक्रिया बदलली असून विद्यार्थ्यांना बसपास मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

मागील दोन वर्षांपासून शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. शाळा बऱयाच काळासाठी बंद होत्या. त्यामुळे बसपास प्रक्रियाही थांबली होती. मागील आठवडय़ापासून 9 वी ते 12 वी आणि सोमवारपासून 6 वी ते 8 वीच्या वर्गांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासासाठी बसपास आवश्यक आहे. दरम्यान जुन्या बसपासची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने 15 सप्टेंबरपर्यंत जुना बसपास दाखवून प्रवास करण्याची मुभा दिली आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन बसपास काढण्यासाठी सेवासिंधू पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी याद्वारे सर्व माहिती भरून ही माहिती मुद्रित करून शाळा-महाविद्यालयात अर्ज जमा करावयाचा आहे. मुद्रित करण्यात आलेल्या अर्जावर संबंधित शाळा-मुख्याध्यापकांची सही घेऊन तो अर्ज बसपास विभागात जमा करावा लागणार आहे.

बसपास मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे

बसपास मिळविण्यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी एक, शाळा-महाविद्यालयात शुल्क भरलेली पावती, स्टॅम्पसाईज तीन फोटो, शाळा ओळखपत्र आणि एससीएसटी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

                वर्गइयत्तेनिहाय बसपासचा दर
प्राथमिक शाळा ( पहिली ते सातवी)150 रु. (10 महिन्यांसाठी)
माध्यमिक शाळा (आठवी ते दहावी)विद्यार्थी 750 रु., विद्यार्थिनींना 550 रु.
माध्यमिक शाळा अनुसूचित जाती-जमाती150 रु.
पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा सामान्य विद्यार्थी1050 रु.
पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा अनुसूचित जाती-जमाती150 रु.
आयटीआय सामान्य विद्यार्थी1310 रु.
आयटीआय अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी160 रु.
व्यावसायिक अभ्यासक्रमातील सामान्य विद्यार्थी1550 रु.
व्यावसायिक अभ्यासक्रमातील अनुसूचित जाती-जमातीचे विद्यार्थी150 रु.
पीएचडी1350 रु.
पीएचडी अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी 150 रु.

Related Stories

अथणी तालुक्यातील साखर कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज

Patil_p

महाराष्ट्रात जाण्याची इच्छा कायम

Patil_p

अंगडी यांना श्रध्दांजली

Omkar B

बकरी-ईद साधेपणाने साजरी

Amit Kulkarni

व्हर्सटाईल ग्रुपचे चेअरमन प्रभाकर जनवाडकर यांचे निधन

Amit Kulkarni

भुयारीमार्गामध्ये शिरले पाणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!