तरुण भारत

लसीच्या बाटल्यांनी झुंबरची निर्मिती

टाकाऊ सामग्रीचा नर्सने केला अभिनव वापर

अमेरिकेच्या कोलोराडो येथील एका नर्सने कोविड लसीच्या रिकाम्या बाटल्यांनी एक अद्भूत झुंबर तयार करून जगाला एक सुंदर संदेश दिला आहे. लॉरा वेसिस या बोल्डर काउंटी पब्लिक हेल्थसाठी काम करत होत्या. त्यांनी बोल्डर काउंटच्या लोकांच्या लसीकरणात मदत करणारे आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ मॉडर्ना लसीच्या रिकाम्या बाटल्यांनी ‘लाइट ऑफ ऍप्रिसिएशन’ तयार करून सर्वांची मने जिंकली आहेत.

Advertisements

याची छायाचित्रे बोल्डर काउंटी पब्लिक हेल्थ नावाच्या फेसबुक पेजवरून 2 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आली. आमच्या गुणवत्तापूर्ण नर्सेसपैकी एक लॉरा वेसिस यांनी ही उत्तम कलाकृती कोविड लसीच्या रिकाम्या बाटल्यांनी तयार केल्याचे म्हटले गेले आहे. या पोस्टला आतापर्यंत 23 हजार शेअर, 29 हजार रिऍक्शन्स आणि 6 हजारांहून अधिक कॉमेंट्स मिळाल्या आहेत.

लसीकरणाचे काम करत असताना माझे लक्ष अनेकदा लसीच्या रिकाम्या बाटल्यांकडे जात होते. एवढय़ा अधिक प्रमाणात बाटल्यांना एकत्र पाहणे वेगळा अनुभव होता. या बाटल्या स्वतःकडे ठेवून त्यांच्या मदतीने एक झुंबर तयार करण्याचा विचार केल्याचे लॉरा यांनी सांगितले आहे. लॉरा यांनी मॉडर्ना लसीच्या रिकाम्या बाटल्यांच्या वापराची अनुमती मिळाल्यावर स्वतःच्या कलेद्वारे जगाला थक्क करून सोडले आहे.

मागील एक वर्ष लोकांसाठी अत्यंत अवघड ठरले आहे. काही लोकांनी बरेच काही गमावले आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अंधकार पसरला आहे. मी या झुंबरद्वारे त्यांच्या जीवनात प्रकाश पसरवू इच्छिते, कारण प्रकाश हे अपेक्षांचा एक संकेत असल्याचे लॉरा यांनी म्हटले आहे.

हा आकर्षक झुंबर तयार करण्यासाठी लॉरा यांनी सर्वप्रथम ऑनलाइन प्रेम खरेदी केली आणि त्यावर लसीच्या रिकाम्या बाटल्यांना लटकवून त्यात प्रकाशाची व्यवस्था केली. लॉरा वेसिस आता निवृत्त झाल्या आहेत. पण त्यांनी फेब्रुवारी महिन्यात बोल्डर काउंटी पब्लिक हेल्थला लसीकरणात मदत केली होती.

Related Stories

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 5 कोटींवर

datta jadhav

किर्गिझस्तानचे अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकोव यांचा राजीनामा

datta jadhav

सोल शहर : कोविड-19 युद्धक्षेत्र

Patil_p

भारत-चीन वादावर मध्यस्थी करण्यास अमेरिका तयार

datta jadhav

युक्रेन : अध्यक्ष बाधित

Omkar B

इंडोनेशियात रात्री चमकणारे गूढ सरोवर

Patil_p
error: Content is protected !!