तरुण भारत

युपीचा मुस्लीम आता जिंकणार!

अयोध्येत असदुद्दीन ओवैसी यांची घोषणा- सपच्या अडचणी वाढणार

वृत्तसंस्था / अयोध्या

Advertisements

एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी स्वतःच्या 3 दिवसीय उत्तरप्रदेश दौऱयाची सुरुवात अयोध्येत पत्रकार परिषद घेत केली आहे. यावेळी ओवैसी यांनी सप अध्यक्ष अखिलेश यादव यांना लक्ष्य केले आहे. मुस्लिमांचा विकास व्हावा असे कुठल्याच पक्षाला वाटत नाही असा आरोप ओवैसी यांनी केला आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत उत्तरप्रदेशचा मुस्लीम जिंकणार असल्याचे म्हटले आहे.

अखिलेश यादव यांनी स्वतःचे सरकार असताना योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात खटला चालविला असता तर योगींना काहीच करता आले नसते हे सत्य आहे. पण मुस्लिमांचा विकास व्हावा असे कुणालाच वाटत नाही. देशातील 19 टक्के मुस्लिमांनी त्यांची गुलामी करावी, पण हिस्सेदारी मागू नये असे राजकीय पक्षांना वाटत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे.

आता आम्ही जिंकू

60 वर्षांपासून सर्वांना विजयी करत आलो आहोत, पण आता आम्ही जिंकू. कधीपर्यंत आम्ही इतरांना खांद्यावरून बसवून विजयी करत राहणार? आम्ही मतदान करू आणि विजयी होऊ. राज्यघटनेने याची अनुमती आम्हाला दिलेली असल्याने कुणाच्या पोटात का दुखावे असे प्रश्नार्थक विधान ओवैसी यांनी केले आहे.

राज्यात 19 टक्के मुस्लीम

ओवैसी यांनी अयोध्येतूनच उत्तरप्रदेशच्या प्रचाराला प्रारंभ केला आहे. उत्तरप्रदेशात सुमारे 19 टक्के मुस्लीम मतदार आहेत. ओवैसी यांच्या एआयएमआयएमने राज्यातील 403 पैकी 100 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. मुस्लीम, यादव आणि ओबीसींमधील अन्य जातींच्या सोशल इंजिनियरिंगच्या मदतीने अखिलेश यंदा विजयाची आस बाळगून आहेत. पण मुस्लिमांची मते विभागली गेल्यास समाजवादी पक्षाला फटका बसणार आहे.

Related Stories

येस बँकेची 49 टक्के मालकी एसबीआयकडे

tarunbharat

भारतात सापडल्या कोविशिल्डच्या बनावट लसी

Abhijeet Shinde

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

datta jadhav

1 फेबुवारीचा शेतकऱयांचा संसदेवरील मोर्चा लांबणीवर

Patil_p

प्रीमियम रेल्वेत मनोरंजनाची सुविधा

Patil_p

कुटुंबप्रमुखाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास वारसांना पेन्शन

Patil_p
error: Content is protected !!