तरुण भारत

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या साताऱयात

प्रतिनिधी/ सातारा

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे गुरुवार, दि 9 सप्टेंबर रोजी सातारा जिल्हय़ाच्या दौऱयावर येत असून जिल्हा बँक निवडणुकीबरोबरच आगामी येणाऱया निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील भाजपा लोकप्रतिनिधींसह सर्व पदाधिकाऱयांशी विभागवार बैठका घेवून चर्चा करणार असल्याची माहिती भाजपाचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिली.

Advertisements

गोसावी यांनी सांगितले की, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक तसेच जिह्यातील आगामी नगरपालिका निवडणूक, जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुका याबाबत भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी लोकप्रतिनिधी यांच्याशी चंद्रकांत पाटील चर्चा करणार आहेत.

दि 9 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत विभागवार बैठका होणार आहेत.  या सर्व बैठकीच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर सुद्धा उपस्थित राहणार असून भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱयांशी चर्चा करून आगामी सर्व निवडणुकांच्या बाबतीत पक्षाचे धोरण ठरवले जाणार आहे. सर्व पदाधिकाऱयांना दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन गोसावी यांनी केले आहे.

Related Stories

राज-उद्धव एकत्र येणार का ? संजय राऊत म्हणाले…

Rohan_P

TET घोटाळा : अश्विन कुमारच्या घरातून 2 किलो सोने, 25 किलो चांदी जप्त

datta jadhav

… तर दिवाळीनंतरही शाळा सुरू करणे अशक्यच : बच्चू कडू

Rohan_P

सातारा पंचायत समितीत शॉर्ट सर्किटने गणपतीच्या आरासीला आग

Abhijeet Shinde

आसू येथे 15 लाखांचा ऐवज चोरी

datta jadhav

सातारा : पैशाच्या हव्यासापोटी चार खून, मृतदेह टाकले मार्ली घाटात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!